बांग्लादेशने (Bangladesh) आयपीएल सामन्यांच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. आम्ही देशात आयपीएलच्या सामन्यांच्या टेलिकास्ट आणि ब्रॉडकास्टवर बंदी घालत आहोत, असं बांग्लादेश सरकारने म्हटलं आहे. मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर करण्यात आलं. त्यानंतर बांग्लादेशने आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. आयपीएलवर बंदी घालण्यासाठी बांग्लादेशच्या क्रीडा मंत्रालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुस्तफिजुर रहमानला (Mustafizur Rahma) IPL मधून बाहेर काढल्यानंतर बांग्लादेशच्या क्रीडा मंत्रालयाशी संबंधित डॉक्टर आसिफ नजरूल यांनी एक पोस्ट केली होती. यात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना बांग्लादेशात IPL सामन्यांचं प्रसारण रोखण्याचं आवाहन केलं होतं. आपल्या पोस्टमध्ये आसिफ नजरूल यांनी मुस्तफिजुर रहमानला देण्यात आलेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. बांग्लादेश क्रिकेट किंवा त्यांच्याशी संबंधित कुठल्याही खेळाडूचा अपमान अजिबात सहन करणार नाही असं म्हटलं होतं.
बांग्लादेशात IPL सामन्यांच्या प्रसारणावर बंदी घातल्याचा मुद्दा तूल पकडू लागला आहे. यावर आता शिक्कामोर्तब झालय. बांग्लादेशचा आता त्या देशांच्या यादीत समावेश झालाय, जिथे BCCI ची टी 20 लीग दाखवली जात नाही. बांग्लादेशात हिंदुंवर हल्ले सुरु आहेत. त्यामुळे बांग्लादेशी खेळाडूंची आयपीएलमधून हकालपट्टी करण्याची मागणी भारतात तीव्रतेने सुरु झालेली.




