spot_img

Indurikar Maharaj : साधेपणाचा उपदेश करणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा शाही साखरपुडा चर्चेत; ट्रोलर्सना कीर्तनातच दिलं तीखट उत्तर

spot_img

अलीकडे लग्न समारंभ हा दोन कुटुंबांचा आनंदाचा सोहळा कमी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा जास्त झाल्याची टीका अनेकदा होते. साधेपणाने लग्न करावे असा सल्ला देणारे समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) नेहमीच लोकांना मोठ्या थाटामाटाच्या विरोधात मार्गदर्शन करताना दिसतात. पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या लेकीचा साखरपुडा मात्र अगदी शाही थाटात पार पडला, आणि त्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.

साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लेकीचे कपडे, दागिने, एंट्री, गाड्यांचा ताफा… या सगळ्यावरून अनेकांनी महाराजांवरच टीका सुरू केली. “साधेपणाचा सल्ला देणारे महाराज स्वतःच थाटात साखरपुडा करत आहेत”, अशा आरोपांवरून सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

याबाबत नुकत्याच झालेल्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी नाराजी व्यक्त केली.
“माझ्याबद्दल म्हणणं ठीक आहे, पण माझ्या मुलीवर टीका करणं ही नीच वृत्ती आहे. तिच्या कपड्यांवर कमेंट करणं म्हणजे लोकं किती खालच्या पातळीला जात आहेत!” असे ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी ट्रोलर्सना थेट आव्हानही दिलं. “मला ठाऊक होतं, काही लोकं माझ्या मुळावरच येणार. पण ऐका माझ्या मुलीचं लग्न याहूनही मोठ्या थाटात करणार! मग बघू कोण काय बोलतं ते,” असा ठणकावलेला इशाराही त्यांनी दिला.

तसंच, कीर्तनासाठी होणाऱ्या खर्चावरून होत असलेल्या चर्चेलाही त्यांनी उत्तर दिलं. “30 मिनिटांच्या सभेला 3 कोटी खर्च असतो! कुठल्याही चॅनेलवाल्यांना विचारून पाहा. हे पैसे कुठून आणतो, अशी विचारणा करणारे लोक विकलेले आहेत,” अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना सुनावलं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ