spot_img

India Post GDS Recruitment 2026 : 10 पास असणाऱ्यांसाठी पोस्ट विभागात विविध पदे, आजच अर्ज करा

spot_img

पोस्ट विभाग अर्थात भारतीय डाक विभागात मेगा भरती सुरू झाली असून तब्बल 25,000 पदे भरली जातील. संचार मंत्रालयाने या भरती प्रक्रियेबद्दले शेड्यूल जारी केले. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. 20 जानेवारी 2026 पासून भरती प्रक्रियेला अर्ज करू शकता. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वी अर्ज करावी लागणार आहेत. भारतीय डाक विभागाकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जात आहे. यातून ब्रांन्च पोस्ट मास्टर अर्थात BPM, असिस्टेंट पोस्ट मास्टर, डाक सेवक या पदांसाठी भरती प्रक्रिया असेल.

या भरती प्रक्रियेची खास गोष्टी म्हणजे सर्व दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. चला तर मग 20 तारखेच्या आता सर्व तयारी करा आणि लगेचच अर्ज करा. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची एक संधी तुमच्याकडे आहे. उमेदवाराला गणित आणि स्थानिक भाषा बोलताना आली पाहिजे, यासोबतच संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे. सायकलही चालवता आली पाहिजे.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला India Post GDS या वेबसाईटवक जाऊन अर्ज करावा लागेल. सर्वात अगोदर Indiapastgdsonline.gov.in वर जा. तिथे गेला की, ऑनलाईन नोंदणीसाठी असलेल्या ऑप्शनवर क्लिक करा. अर्जामध्ये मागितलेली माहिती तिथे भरा. त्यानंतर कागदपत्रे अपलो़ड करा. भरतीसाठी लागणारी फीस भरा ( जर तुम्हाला लागू असेल तर) त्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या आणि अर्ज सबमिट करा.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ