spot_img

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी सामना रंगणार ‘या’ दिवशी !

spot_img

टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 14 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेत भिडणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडिया 14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे.टीम इंडिया (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात कसोटी मालिकेत एकूण 2 सामने होणार आहेत. या मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या मालिकेत विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र कोणत्या एकाच संघाचा विजय होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पहिल्याच सामन्यात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी होईल. तर 9 वाजता टॉस होईल. शुबमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत याचं दुखापतीनंतर कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. पंतकडे उपकर्णधार, विकेटकीपिंग आणि बॅटिंग अशी तिहेरी जबाबदारी आहे. तर टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीअंतर्गंत खेळवण्यात येणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.तर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ