spot_img

IND vs SA : संजू सॅमसनच्या निवडीवरून वाद, BCCI ला सल्ला

spot_img

कोलकाता नाइट रायडर्सचे टीमचे माजी डायरेक्टर जॉय भट्टाचार्य काय म्हणाले ?

आशिया कप टुर्नामेंट सप्टेंबर महिन्यात झाली. त्यानंतर सहापैकी चार टी 20 सामन्यत संजू सॅमसनला (Sanju Samson) विश्रांती देण्यात आली. प्लेइंग इलेव्हनमध्ये जितेश शर्माचा समावेश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. शुबमन गिल आल्यानंतर संजूला मधल्याफळीत ढकललं. नव्या भूमिकेत पाच इनिंग खेळल्यानंतर पुन्हा संजूला टीममधून ड्रॉप करण्यात आलं. स्पेशलिस्ट फिनिशर म्हणून जितेश शर्माचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. तो सुद्धा विकेटकिपिंग करतो. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कटक येथे जितेश शर्मा टीममध्ये होता. पण संजू सॅमसनला सलग चौथ्या सामन्यात वगळण्यात आलं. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

कोलकाता नाइट रायडर्सचे (KKR) टीमचे माजी डायरेक्टर जॉय भट्टाचार्य क्रिकबझशी या मुद्यावर बोलले आहेत. “पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये तुम्ही शुबमन गिलला ओपनर म्हणून निश्चित केलं असेल, तर संजू सॅमसनला टीममध्ये ठेवण्यात काही पॉइंट नाही. मागच्यावर्षी ओपनर म्हणून त्याने तीन शतकं झळकावली. स्वत:ला सिद्ध केलं. मिडल ऑर्डरमध्ये संजूपेक्षा विकेटकीपर फिनिशर म्हणून सिलेक्टर्ससमोर ऋषभ पंत चांगला पर्याय आहे” असं मत जॉय भट्टाचार्य यांनी नोंदवलं. “जर तुम्ही संजूला वरती बॅटिंग करण्याची संधी देणार नसाल, तर त्याला टीममध्ये ठेवण्यात पॉइंट नाही. त्याऐवजी तुम्ही ऋषभ पंतला संधी द्या. तो 4,5,6 व्या नंबरवर बॅटिंग करतो. संजूने ओपनर म्हणून तीन शतकं झळकावली आहेत. तुमच्यासाठी त्या पोझिशनवर चांगली कामगिरी केलीय. ओपनर म्हणून तुम्ही शुबमन गिलला निश्चित केलं असेल, तर मग किपर तुमचा फिनिशर असला पाहिजे, जो जितेश आहे” असं जॉय भट्टाचार्य म्हणाले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ