केन विलियमसन वनडे मालिकेतून बाहेर; भारत-न्यूझीलंड 3 वनडे आणि 5 टी20I सामन्यांचा थरार जानेवारीत
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 सामन्यांची टी20I मालिका 3-1 ने जिंकत टीम इंडियाने 2025 वर्षाचा शेवट विजयाने केला. आता नववर्षात मायदेशात भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिकांना सुरुवात होणार असून न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand tour of India 2026) या दौऱ्यासाठी आपले संघ जाहीर केले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी20I सामने खेळवले जाणार आहेत. न्यूझीलंडने सोशल मीडियाच्या माध्यमातून संघांची घोषणा केली. एकदिवसीय मालिकेत मायकल ब्रेसवेलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर टी20I मालिकेत मिचेल सँटनर संघाचे नेतृत्व करणार आहे.
दरम्यान, न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार केन विलियमसन एकदिवसीय संघात नाही. तो दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एसए20 लीगमध्ये खेळणार असल्याने या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत केन खेळणार नसल्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक:
- पहिला सामना – 11 जानेवारी, बडोदा
- दुसरा सामना – 14 जानेवारी, राजकोट
- तिसरा सामना – 18 जानेवारी, इंदूर
वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड संघ:
मायकल ब्रेसवेल (कर्णधार), आदि अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेवोन कॉनव्हे, जॅक फॉल्क्स, मिच हे (यष्टीरक्षक), कायल जेमीसन, निक केली, जेडन लेनॉक्स, डॅरेल मिचेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, माइकल रे, विल यंग.
भारत-न्यूझीलंड टी20I मालिकेचे वेळापत्रक:
- पहिला सामना – 21 जानेवारी, नागपूर
- दुसरा सामना – 23 जानेवारी, रायपूर
- तिसरा सामना – 25 जानेवारी, गुवाहाटी
- चौथा सामना – 28 जानेवारी, विशाखापट्टणम
- पाचवा सामना – 31 जानेवारी, तिरुवअनंतपुरम
टी20I सीरिजसाठी न्यूझीलंड संघ:
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनव्हे (यष्टीरक्षक), जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेनरी, कायल जेमीसन, बेवोन जॅकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, टीम रॉबिन्सन, ईश सोढी.




