spot_img

Ind Squad Vs Sa ODI Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी गिल-बाहेर तर पंत कर्णधारपदाच्या रेसमध्ये आघाडीवर?

spot_img

शुभमन गिलच्या मानदुखीमुळे वनडे मालिकेतून माघार; श्रेयस अय्यर आधीच बाहेर. पंत व राहुल कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार. नवोदितांना संधी मिळण्याची शक्यता वाढली.

भारत व दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर 30 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेआधी भारतीय संघावर दुखापतींचे संकट अधिक गडद झाले आहे. उपकर्णधार श्रेयस अय्यर आधीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्याने बाहेर असताना आता कर्णधार शुभमन गिलही मानदुखीमुळे उपलब्ध राहणार नाही, अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, गिलच्या (Shubhaman Gill) फिटनेसवर धोका न पत्करता त्याला संपूर्ण विश्रांती देण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला आहे. पहिल्या कसोटीत दुखापत झाल्यानंतर गिल मैदानात उतरू शकला नव्हता आणि दुसऱ्या कसोटीतही तो खेळला नाही. टी20 मालिकेपर्यंत तो पूर्णपणे सावरू शकेल, असा सेलेक्टर्सचा अंदाज आहे.

गिल व अय्यर (Shreyas Iyer) दोघेही बाहेर गेल्याने कर्णधारपदासाठी ऋषभ पंत (Rishabh Pant) व केएल राहुल (K L Rahul) यांची नावं आघाडीवर आहेत. पंत वनडे संघात परत येण्यासाठी सज्ज असून त्याला नेतृत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. पंत कर्णधार झाल्यास राहुल उपकर्णधार होऊ शकतो.

दरम्यान, गिलच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वालकडे ओपनिंगची जबाबदारी सोपवली जाईल, तर अभिषेक शर्मा याला बॅकअप ओपनर म्हणून बोलावले जाऊ शकते. गोलंदाजीत सिराज, अर्शदीप व हर्षित राणा पुन्हा एकदा मुख्य भूमिका निभावतील. हार्दिक पांड्या (Hardik Pandey) वनडे मालिकेसाठी उपलब्ध नसल्याने नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) या मालिकेत अतिरिक्त पेस पर्याय ठरू शकतात. जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती देण्यात येणार असून तो टी20 मालिकेत पुनरागमन करेल.

स्पिन विभागातही बदल दिसू शकतो. कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) लग्नासाठी सुट्टी मागितल्याने तो मालिकेत खेळणार नाही. अशा परिस्थितीत वरुण चक्रवर्तीचे संघात पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे. अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदरबरोबर वरुणची स्पिन त्रिकूटात निवड होण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध वनडे मालिकेसाठी संभाव्य भारतीय संघ :

  • ऋषभ पंत (कर्णधार)
  • रोहित शर्मा
  • यशस्वी जैस्वाल
  • विराट कोहली
  • अक्षर पटेल
  • केएल राहुल
  • नितीश कुमार रेड्डी
  • वॉशिंग्टन सुंदर
  • वरुण चक्रवर्ती
  • हर्षित राणा
  • मोहम्मद सिराज
  • अर्शदीप सिंग
  • प्रसिद्ध कृष्णा
  • आकाश दीप
  • ध्रुव जुरेल
हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ