चाकण्यापासून डेझर्टपर्यंतचा प्रवास; मद्यप्रेमींमध्ये नवे प्रयोग ट्रेंडमध्ये
चव बदलण्याच्या नादात आजकाल लोक खाद्यपदार्थांमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. पदार्थ जितका वेगळा तितकी त्याची चर्चा जास्त, असा सध्याचा ट्रेंड आहे. मात्र असे प्रयोग कधी कधी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात असतानाही मद्यप्रेमी वेगळीच वाट धरताना दिसत आहेत.
भारतात दारूसोबत चकणा म्हणून शेंगदाणे, चिवडा, फरसाण किंवा भजी खाण्याची परंपरा जुनी आहे. मात्र आता हा ट्रेंड बदलत असून, काही लोक थेट दारूसोबत डेझर्ट आणि आईस्क्रीम ट्राय करत आहेत. ऐकायला विचित्र वाटेल, पण सोशल मीडिया आणि पार्टी कल्चरमुळे हे कॉम्बिनेशन लोकप्रिय होत आहे.
मद्य शरीरासाठी अपायकारक असल्याचा इशारा सरकार आणि डॉक्टर सातत्याने देत असले, तरीही मद्यपानाचा खप कमी झालेला दिसत नाही. उलट, वेगवेगळ्या ड्रिंक्स मिक्स करणे, युनिक चव शोधणे आणि आता तर आईस्क्रीमसोबत दारू पिणे, असे हटके प्रयोग चर्चेत आले आहेत.
हे आहेत दारू आणि आईस्क्रीमचे चर्चेतले 5 कॉम्बिनेशन
** रोझ वाईन + स्ट्रॉबेरी आईस्क्रीम**
हलकी, फ्रुटी चव असलेली रोझ वाईन स्ट्रॉबेरी आईस्क्रीमसोबत घेतल्यास क्रिमी आणि रिफ्रेशिंग फ्लेवर मिळतो, असा दावा केला जातो.
व्होडका + मँगो आईस्क्रीम
क्लब्स आणि पार्टीमध्ये लोकप्रिय असलेल्या व्होडकासोबत मँगो आईस्क्रीम मिक्स केल्यास लाईट आणि फ्रेश टेस्ट तयार होते.
**व्हाईट रम + लिची आईस्क्रीम**
व्हाईट रमची तीव्रता कमी करण्यासाठी लिची आईस्क्रीम वापरले जाते. त्यामुळे चव ओव्हरपॉवरिंग न वाटता सॉफ्ट होते.
आयरिश व्हिस्की + कॉफी आईस्क्रीम
थोडी स्मोकी आणि मातीसारखी चव असलेल्या आयरिश व्हिस्कीला कॉफी आईस्क्रीम बॅलन्स देत असल्याचं मद्यप्रेमी सांगतात.
- जिन + व्हॅनिला आईस्क्रीम
हर्बल आणि फ्रेश टेस्ट असलेल्या जिनसोबत व्हॅनिला आईस्क्रीमचा कॉम्बिनेशन सध्या क्लासिक ड्रिंक लव्हर्समध्ये लोकप्रिय ठरत आहे.




