spot_img

Hrithik Roshan : ‘माझं शरीर अचानक ऑफ होतं…’ हृतिक रोशनने आरोग्याबाबत केला भावनिक खुलासा

spot_img

कुबडीसह दिसल्यानंतर प्रश्नांचा भडिमार; इन्स्टाग्राम पोस्टमधून वेदनांवर विनोदाची फुंकर

बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) नुकताच अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) यांचे पती गोल्डी बहल यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला होता. मात्र यावेळी तो कुबडीच्या आधाराने चालताना दिसल्याने चाहत्यांना धक्का बसला. हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याच्या आरोग्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले.

या चर्चांना पूर्णविराम देत हृतिक रोशनने स्वतः इन्स्टाग्रामवर एक सविस्तर आणि मनापासूनची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पहिल्यांदाच त्याच्या आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर आणि आश्चर्यकारक गोष्टी उघड केल्या आहेत. हृतिकने स्पष्ट केलं की, तो सध्या विविध शारीरिक समस्यांशी झुंज देत असून, काही अडचणी तर त्याला जन्मापासूनच आहेत.

25 जानेवारी रोजी शेअर केलेल्या पोस्टमध्ये हृतिकने लिहिलं की, अचानक त्याच्या डाव्या गुडघ्याने ‘ब्रेक’ घेतल्यासारखी अवस्था निर्माण झाली आणि पूर्ण दिवस वेदनांनी गेला. “हे माझ्यासाठी नवीन नाही. माझं शरीर कधी, कसं वागेल, हे मी स्वतःही पूर्णपणे समजू शकत नाही,” असं तो म्हणतो. त्याच्या मते, त्याच्या शरीरातील काही अवयव अक्षरशः ऑन-ऑफ बटणासारखे काम करतात. डावा पाय, डावा खांदा आणि उजवा घोटा कधीही अचानक ‘ऑफ’ होतात, आणि ही गोष्ट त्याच्यासाठी जन्मापासूनचीच आहे.

या शारीरिक अडचणींमुळे मानसिक स्तरावरही वेगळे अनुभव मिळाल्याचं हृतिक सांगतो. निराशा, असहायता आणि अंधाराशी झुंज देताना त्याने स्वतःमध्ये एक वेगळी मानसिक यंत्रणा विकसित केली असून, त्यात विनोदबुद्धी ही त्याची सर्वात मोठी ताकद ठरली आहे.

पोस्टमध्ये हृतिकने एक गंमतीशीर अनुभवही शेअर केला. काही दिवसांपासून त्याची जीभ ‘रात्रीचं जेवण’ हा शब्द उच्चारायलाच नकार देत असल्याचं त्याने सांगितलं. चित्रपटाच्या सेटवर गंभीर कोर्टरूम सीन सुरू असताना ‘रात्रीच्या जेवणासाठी घरी येशील का?’ हा संवाद बोलायचा असतो, पण तोंडातून वारंवार ‘दुपारचं जेवण’च निघतं. परिणामी, दिग्दर्शक गोंधळतात, सहकारी धावपळ करतात आणि अखेर सीन तसाच शूट केला जातो.

“या सगळ्या गोंधळात माझे चेहरेपट्टीचे हावभाव, चुकल्यावर स्वतःवर हसणं, आणि सहाय्यकांचं प्रामाणिक सहकार्य हे सगळं माझ्यासाठी अमूल्य आहे,” असं हृतिक भावनिकपणे लिहितो. अखेरीस तो म्हणतो की, या सगळ्या प्रसंगांतून बाहेर पडताना त्याचा मेंदू त्याला सांगतो जखम हळूहळू भरून येते आहे, आणि ती भावना अमाप मोलाची आहे. हृतिकच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला असून, त्याच्या प्रामाणिकपणाचं आणि सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ