गालावर पडणाऱ्या खळी (Dimple)च्या प्रेमात सगळेच पडतात. मुलींमध्ये तर गालावर पडणाऱ्या खळीची वेगळीच क्रेज पाहायला मिळते. गालावर पडणाऱ्या खळ्या खरं तर जन्मतः आणि नैसर्गिक असतात. त्यामुळे खळ्या आधीपासून नसताना त्या मिळवणं थोडं अवघड असू शकतं. पण यासाठी काही चेहऱ्याचे व्यायाम तुमची मदत करू शकतात. व्यायामामुळे तुमच्या गालावर खळ्या पडण्यास मदत होईल. तुमच्या गालावर जिथे तुम्हाला खळ्या हव्या आहेत त्या ठिकाणी एखादा पेन किंवा बोटाने दाब द्या. दाबताना एक लांब हास्य ठेवा. यानेही कालांतराने तुमच्या गालावर खळ्या पडण्यास मदत होईल.
तुम्हाला गालावर बोट किंवा एखादी पेन्सिल, पेन ठेवायचे आहे. यावेळी दिलखुलास हसा. हसल्यावरच गालावरच्या खळ्या स्पष्टपणे दिसतात. म्हणून गालावर बोट ठेवून हसा. याने गालावर खळ्या पडण्यास सुरुवात होईल. पुढील व्यायामात गाल दोन्ही हातांनी हलके ओढा आणि मोठ्याने हसा. से केल्यानं ओठांमधील स्नायू तुमच्या कानांकडे जातात. यामुळे तुमच्या तोंडाभोवती रेषा तयार होतील आणि तुमच्या गालावर नैसर्गिकरित्या डिंपल तयार होण्यासाठी मदत होईल.




