spot_img

Hera Pheri 3 Movie : ‘हेरा फेरी 3’ चा वाद कोर्टात; प्रोड्यूसरने फिरोज नाडियाडवालांवर ठोकली केस

spot_img

अक्षय कुमार (Akshay Kumar), परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्या गाजलेल्या कॉमेडी फ्रँचायझी ‘हेरा फेरी 3’ (Hera Pheri 3) बद्दल अजूनही सस्पेन्स कायम आहे. अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे परेश रावलने चित्रपटातून काढता पाय घेतला होता. अनेक वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत राहणारा हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या राईट्समुळे सध्या प्रोड्युसर्समध्ये आता शा‍ब्दिक वाद सुरू झाला आहे. टॉलिवूड इंडस्ट्रीतील निर्मात्यांनी फिरोज नाडियाडवाल (Firoz A. Nadiadwala) च्या चित्रपटावर अर्थात ‘हेरा फेरी 3’वर स्वत:चा दावा केला आहे.

संबंधित प्रकरणाची सुनावणी सध्या मद्रास हायकोर्टामध्ये सुरू आहे. या सुनावणीदरम्यान निर्माता फिरोज नाडियाडवाला यांना खरोखर ‘हेरा फेरी 3’ चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे का? असा सवाल निर्मात्यांना विचारण्यात येत आहे. सेव्हन आर्ट्स इंटरनॅशनल या प्रॉडक्शन हाऊस कंपनीने दाखल केलेल्या याचिकेनंतर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, फिरोज नाडियाडवाला यांच्याकडे नाही तर त्या प्रॉडक्शन हाऊसकडे “हेरा फेरी” चित्रपटाच्या फ्रँचायझीचे कॉपीराइट आहेत.

सेव्हन आर्ट्स इंटरनॅशनलचे मॅनेजिंग डायरेक्टर जीपी विजयकुमार यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, 2000 साली प्रदर्शित झालेला “हेरा फेरी” हा चित्रपट प्रत्यक्षात “रामजी राव स्पीकिंग” (1989) या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक होता, जो फिरोज नाडियाडवाला यांना बनवण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यांना फक्त एकच चित्रपट बनवण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपनीच्या मते, या परवानगीमध्ये सिक्वेल बनवण्याचा किंवा पात्रांचा पुढील वापर करण्याचा अधिकार नव्हता.

असे असूनही, नाडियाडवालाने 2006 मध्ये “फिर हेरा फेरी”ची निर्मिती केली आणि आता त्यांनी तिसर्‍या भागाचे हक्क अभिनेता अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊसला विकल्याचे वृत्त आहे. यामुळे वाद वाढला आहे. सेव्हन आर्ट्स इंटरनॅशनलचे मॅनेजिंग डायरेक्टर जीपी विजय कुमार यांचा दावा आहे की, त्यांनी 2022 मध्ये “रामजी राव स्पीकिंग” चे मूळ निर्माते आदित्य फिल्म्सकडून फ्रँचायझीचे संपूर्ण राइट्स कायदेशीर रित्या खरेदी केले होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ