spot_img

Hema Mailini On Dharmendra Health Reports : धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरवणाऱ्यांना हेमा मालिनीने फटकारलं

spot_img

अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू आहेत. अशातच धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर थेट धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं. माध्यमांवर सातत्यानं धर्मेंद्र आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरत असल्यामुळे देओल कुटुंबीय सातत्यानं सोशल मीडियावर माहिती शेअर करतंय. तसेच, धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना अफवा आणि खोट्या बातम्या पसरवण्यापासून दूर राहण्याचं आवाहनंही केलंय.

सनी देओलच्या टीमनं सर्वात आधी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट जारी केलं. त्यानंतर ईशा देओलनंही माध्यमांवर फिरत असलेल्या अफवा आहेत, तिचे वडील धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती दिली. तसेच, लोकांना खोट्या अफवा पसरवण्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. अशातच आता धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहेत आणि अफवा पसरवल्याबद्दल मीडियाला फटकारलं आहे. हेमा मालिनी यांनी ट्विट करत धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट देताना म्हटलंय की, “जे घडतंय ते अक्षम्य आहे! जबाबदार चॅनेल्स उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होणाऱ्या माणसांबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादर करणारं आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा…” असे हेमा मालिनी म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ