spot_img

Helicopter Crash Landing : हेलिकॉप्टरमध्ये अचानक झाला बिघाड; पालघरच्या केळवे परिसरात इमर्जन्सी लँडिंग

spot_img

मुंबईजवळील पालघरमध्ये एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग हे शाळेच्या मैदानात करण्यात आलं. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये ४ प्रवाशी सुखरूप बचावले आहे. मुंबईहून सुरतकडे निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. अचानक हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे पालघरच्या केळवे रोड परिसरात हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

पायलटच्या प्रसंगावधानामुळे हेलिकॉप्टरमधील चारही जण सुखरूप बचावले आहे. हे हेलिकॉप्टर जुहू विमानतळावरून सुरतकडे निघालं होतं. पण मध्येच हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे हेलिकॉप्टरला केळवे रोड येथील विद्या वैभव हायस्कूलच्या खुल्या मैदानात हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
या हेलिकॉप्टरमध्ये एक जुनियर पायलट, एक सीनियर पायलट आणि एक इंजिनियरसह एक आणखी इसम असल्याची माहिती समोर आली आहे. दुरुस्तीनंतर हेलिकॉप्टर पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं रवाना झालं. सुदैवाने या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये कोणतीही हानी झाली. या हेलिकॉप्टरमध्ये नेमका काय बिघाड झाला होता? प्रवाशी कोण होते? याची माहिती समोर आली नाहीये .

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ