spot_img

Health Tips : पलंगावर बसून जेवता? ही सवय हळूहळू शरीरासाठी ठरू शकते धोकादायक

spot_img

अंथरुणावर खाण्यामुळे पचन, झोप आणि स्वच्छतेवर गंभीर परिणाम; डॉक्टर काय सांगतात?

निरोगी आयुष्य जगण्यासाठी काय खातो याइतकंच कसं खातो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना पलंगावर बसून किंवा आडवे होऊन मोबाईल, टीव्ही पाहत जेवण्याची सवय लागलेली दिसते. ही सवय सोयीची वाटत असली तरी, दीर्घकाळात ती आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते.

तज्ज्ञांच्या मते, अन्न खाल्ल्यानंतर शरीर सरळ स्थितीत असणं आवश्यक असतं. त्यामुळे अन्न अन्ननलिकेतून सहज पोटात जातं आणि पचनक्रिया नीट पार पडते. मात्र पलंगावर वसून किंवा आडवे होऊन खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण येतो. यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ, गॅस, अपचन यांसारख्या समस्या वाढण्याची शक्यता असते.

विशेषतः रात्री पलंगावर जेवण केल्यास पचनाची गती मंदावते. अन्न नीट न चावता घाईघाईत खाल्लं जातं, परिणामी पोट फुगणं, बद्धकोष्ठता आणि झोपेचा त्रास जाणवतो. ज्यांना आधीपासूनच अ‍ॅसिडिटी किंवा GERDचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही सवय अधिक धोकादायक ठरू शकते.

याशिवाय, पलंगावर जेवताना बहुतेक वेळा लक्ष अन्नाकडे नसून मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर असतं. त्यामुळे आपण किती खातोय याचं भान राहत नाही आणि जास्त खाण्याची शक्यता वाढते. याचा परिणाम वजनवाढ, लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांवर होऊ शकतो.

स्वच्छतेच्या दृष्टीनेही ही सवय योग्य नाही. अन्नाचे छोटे कण चादरी, उशा आणि गादीत अडकतात. हे कण जंतू, बुरशी आणि कीटकांना आकर्षित करतात, ज्यामुळे ऍलर्जी, दमा, श्वसनविकार किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही तज्ज्ञ इशारा देतात. पलंग हे विश्रांतीसाठी असावं, पण तिथेच खाणं, टीव्ही पाहणं आणि सतत अ‍ॅक्टिव्ह राहणं यामुळे मेंदू गोंधळतो. परिणामी झोपेची गुणवत्ता कमी होते आणि थकवा वाढतो.

आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर जेवणासाठी निश्चित जागा ठेवा. टेबल-खुर्चीवर सरळ बसून, शांतपणे आणि स्क्रीनपासून दूर राहून अन्न खाणं अधिक फायदेशीर ठरतं. जेवणानंतर थोडं चालणं आणि तोंड स्वच्छ करणंही आवश्यक आहे.

पलंगावर बसून खाणं जरी आरामदायक वाटत असलं, तरी दीर्घकाळासाठी ते पचन, झोप आणि एकूण आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे अंथरुणाचा उपयोग फक्त झोप आणि विश्रांतीसाठीच करणं आरोग्यासाठी उत्तम ठरेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ