spot_img

Health Test : लग्नाआधी आरोग्याची खात्री! तरुण जोडप्यांमध्ये वाढतोय या टेस्टचा नवा ट्रेंड

spot_img

बाळ न होण्याची जबाबदारी फक्त महिलांची नाही; पुरुषही 40 टक्के कारणीभूत, तज्ज्ञांचा खुलासा

काही वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी ठरवलेल्या व्यक्तीशीच लग्न करण्याची परंपरा होती. मात्र काळ बदलत गेला तसं तरुण-तरुणींनी स्वतःचा जीवनसाथी निवडण्यास सुरुवात केली. एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधून, भविष्यातील अडचणी आधीच समजून घेण्याकडे त्यांचा कल वाढला. आता याच बदलत्या विचारसरणीत आणखी एक महत्त्वाची पायरी जोडली गेली आहे, ती म्हणजे लग्नाआधी हेल्थ चेकअप.

सध्या अनेक तरुण जोडपी लग्नाआधी आरोग्य तपासणी करत असून, त्यात फर्टिलिटी टेस्टचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात बाळ होण्यासंदर्भात कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत, यासाठी अनेक जण ही चाचणी कोणालाही न सांगता करून घेत आहेत.

फर्टिलिटी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या लक्षणीयरीत्या घटत आहे. 2022 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार 1973 ते 2018 या कालावधीत पुरुषांमधील सरासरी स्पर्म काउंटमध्ये तब्बल 51.6 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. तरीही आजही समाजात बाळ न होण्यास प्रामुख्याने महिलांनाच जबाबदार धरले जाते. मात्र उपलब्ध आकडेवारीनुसार देशातील वंध्यत्वाच्या प्रकरणांमध्ये सुमारे 40 टक्के कारणे पुरुषांशी संबंधित आहेत.

पुरुष वंध्यत्वामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये वीर्याचे कमी प्रमाण, स्पर्मचे अपुरे उत्पादन, स्पर्मचे असामान्य कार्य किंवा स्पर्मच्या प्रवासातील अडथळे यांचा समावेश होतो. यासोबतच काही बाह्य घटकही वंध्यत्वाला कारणीभूत ठरतात. धूम्रपान, अति मद्यपान, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, सततचा ताणतणाव, रसायने व कीटकनाशकांशी संपर्क यांचा यामध्ये समावेश आहे. काही आजार, दुखापती किंवा दीर्घकालीन आजारदेखील पुरुषांच्या फर्टिलिटीवर परिणाम करू शकतात. यामुळेच बदलत्या काळात लग्नाआधी फर्टिलिटी टेस्ट करून आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा निर्णय अनेक तरुण जोडपी घेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ