spot_img

Health News : सकाळी रिकाम्या पोटी काय खावे? केळी की खजूर

spot_img

आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी संतुलित आहाराला विशेष महत्त्व आहे. अनेकजण दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात, पण तज्ज्ञांच्या मते सकाळची सुरुवात पौष्टिक फळांनी केली तर पचनसंस्था चांगली कार्य करते आणि शरीराला दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा मिळते.अशा वेळी प्रश्न पडतो की रिकाम्या पोटी केळी खाणे योग्य की खजूर?

रिकाम्या पोटी केळी खाण्याचे फायदे-

केळी हे सर्वाधिक खाल्ले जाणारे आणि सहज उपलब्ध फळ आहे. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी आणि भरपूर फायबर असते. त्यामुळे ते शरीराला त्वरित ऊर्जा देते आणि थकवा दूर करण्यास मदत करते. योग्य प्रमाणात केळी खाल्ल्यास पचन सुधारते आणि स्नायूंनाही बळ मिळते. मात्र, ज्यांना अॅसिडिटी किंवा इतर पोटाचे त्रास असतील त्यांनी रिकाम्या पोटी केळी टाळावीत.

खजूर खाण्याचे फायदे-

खजूर पोषक तत्वांचा उत्तम स्रोत मानला जातो. त्यात फायबर, लोह, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. खजूर ऊर्जा वाढवतो, रक्तातील हिमोग्लोबिन सुधारण्यास मदत करतो आणि पचनसंस्था सुरळीत ठेवतो. विशेषतः पचनासंबंधी समस्या असलेल्या व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यास फायदा होऊ शकतो. अनेकजण खजूर दुधासोबत सेवन करणे पसंत करतात.

मग नक्की काय खावे?

जर तुम्हाला पोटाच्या तक्रारी असतील तर रिकाम्या पोटी केळी टाळून खजूर निवडणे योग्य ठरू शकते. वजन वाढवायचे असल्यास केळी आणि खजूर दोन्ही आहारात समाविष्ट करणे फायदेशीर आहे. एकूणच, तुमच्या शरीराच्या गरजेनुसार आणि प्रकृतीनुसार सकाळचा आहार निवडणे महत्त्वाचे आहे. योग्य पर्याय निवडल्यास दिवसाची सुरुवात अधिक आरोग्यदायी आणि उत्साही होऊ शकते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ