आईने कडू काढा दिला की आजही आपण तोंड वाकडं करायचो किंवा गोळी घेताना ती जिभेला लागली की नकोसं होतं. ‘कडू’ चवीपासून आपण नेहमी लांब पळतो. निसर्गाचा नियम असा आहे की, बहुतेक विषारी वनस्पती कडू असतात, त्यामुळे मानवी मेंदूला कडू चव म्हणजे ‘धोका’ असे संकेत मिळतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा हेच ‘कडू’ आपल्याला बरं करण्यासाठी सर्वात जास्त प्रभावी ठरतं.
कडू चव आणि ‘डिटॉक्स’ प्रक्रियाआयुर्वेदानुसार, कडू चव ही शरीरातील ‘पित्त’ आणि ‘कफ’ दोष संतुलित करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. कडू पदार्थ नैसर्गिकरित्या रक्ताचे शुद्धीकरण करतात. जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा शरीरात अनेक टॉक्सिन्स जमा झालेले असतात.पचनशक्ती वाढवण्यासाठी मदततुम्ही नोटीस केलं असेल की, आजारपणात आपली भूक मरते. कडू चव जिभेवरील चव ग्रंथींना अशा प्रकारे उत्तेजित करते की, त्यामुळे पोटात पाचक रस पाझरू लागतात. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला अन्नातील पोषक तत्व शोषून घेण्यास मदत होते. मेंदूला मिळणारे संकेतजेव्हा आपण काहीतरी कडू खातो, तेव्हा आपला मेंदू आणि रोगप्रतिकारशक्ती लगेच ‘अलर्ट’ मोडवर येते. कडू चव शरीराच्या संरक्षण यंत्रणेला सक्रिय करते, ज्यामुळे पांढऱ्या पेशी (White Blood Cells) संसर्गाशी लढण्यासाठी तयार होतात.दाहशामक गुणधर्म शरीरात कोठेही सूज किंवा दाह (Inflammation) असल्यास कडू औषधं ती कमी करण्यास मदत करतात. ‘कडू औषधं हीच खरी मित्र असतात’ ही जुनी म्हण वैज्ञानिकदृष्ट्याही तितकीच खरी आहे.




