spot_img

Health News : थंडीत बामचा अतिवापर केल्याने होतात ‘हे’ दुष्परिणाम !

spot_img

थंडीमुळे स्नायूंमध्ये वेदना व अंगदुखी (Body Aches) वाढते. सर्दी, नाक बंद होणे, डोके जड वाटणे. थंड हवेमुळे सांधेदुखी व पाठदुखीचा त्रास होणे. रात्री झोप न लागणे किंवा डोकेदुखी या त्रासांवर घरगुती उपाय म्हणून बामचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. थंडीच्या दिवसांत बामचा वापर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत मोठ्या प्रमाणात केला जातो.मात्र, दररोज आणि अति वापर केल्यास त्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

दररोज बाम (Balm) लावण्याचे फायदे –
बाममध्ये असलेले मेंथॉल, कापूर, युकॅलिप्टस तेल यामुळे स्नायू व सांधेदुखीवर तात्काळ आराम मिळतो. कपाळावर किंवा मानेवर थोड्या प्रमाणात बाम लावल्यास ताण कमी होऊन डोकेदुखी कमी होते. तसेच छाती किंवा नाकाजवळ बाम लावल्यास श्वास घेणे सुलभ होते.

दररोज बाम वापरण्याचे तोटे –
दररोज बाम वापरल्याने त्वचेवर जळजळ व ॲलर्जी होते. बामाच्या अतिवापरामुळे त्वचा लाल होणे, खाज सुटणे किंवा जळजळ होऊ शकते. तसेच त्वचा कोरडी होण्याचा धोका असतो. काही बाममधील रसायनांमुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. सतत बाम वापरल्याने सवय लागण्याची शक्यता असते. डोकेदुखी किंवा अंगदुखी झाली की लगेच बाम लावण्याची मानसिक सवय लागू शकते. तज्ज्ञांच्या मते, बाम लावल्याने मूळ कारणावर उपचार होत नाही. बाम तात्पुरता आराम देतो. बामचा वापर मर्यादित आणि गरजेपुरताच करावा. जखम, डोळे किंवा नाकाच्या आत बाम लावू नये. दीर्घकाळ वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांवर बाम वापरण्याआधी विशेष काळजी घ्यावी.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ