spot_img

Health News : ओलं खोबरं खाल्ल्याने वाढते मधुमेह असणाऱ्या रुग्णांची साखर?

spot_img

मग ती देवाला वाहिलेली नारळाची वाटी असो, दक्षिण भारतीय चविष्ट चटणी असो किंवा पुरणपोळीसोबतची कटाची आमटी… नारळाशिवाय जेवणाला पूर्णत्व येत नाही. केवळ चवीसाठीच नाही. आपल्या भारतीय स्वयंपाकघरात नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

तज्ज्ञांच्या मते, मधुमेही व्यक्ती मर्यादित प्रमाणात कच्चं ओलं खोबरं नक्कीच खाऊ शकतात. उलट, नारळाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असल्यामुळे ते साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखण्यास मदत करते. नारळामध्ये मध्यम-साखळी फॅट्स (Medium-chain fats) असतात. हे फॅट्स शरीरात चरबी म्हणून साचण्याऐवजी लगेच ऊर्जेत रूपांतरित होतात. त्यामुळे अशक्तपणा जाणवणाऱ्या मधुमेहींसाठी हे ऊर्जावर्धक ठरते. नारळातील तंतुमय पदार्थ पोट जास्त काळ भरलेले ठेवतात. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अवेळी स्नॅक्स खाण्याची इच्छा कमी होते. टाईप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी वजन नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे असते, त्यात नारळ (Coconut) मदत करतो. नारळामध्ये कॅलरी आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात. त्यामुळे अतिसेवनाने वजन वाढू शकते किंवा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, मधुमेही रुग्ण दिवसाला साधारण 30 ते 40 ग्रॅम (ओलं खोबरं सुरक्षितपणे खाऊ शकतात.

पण गोड पदार्थ टाळा: नारळाच्या वड्या, बर्फी (Barfi) किंवा साखर (Sugar) घातलेले पदार्थ मधुमेहींनी पूर्णपणे टाळावेत.आपल्या आहारात नारळाचा समावेश केल्यानंतर रक्तातील साखरेची तपासणी करून पहा, जेणेकरून तुमचे शरीर त्याला कसा प्रतिसाद देते हे तुम्हाला समजेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ