spot_img

Hair Tips : केस गळतीने हैराण आहात? आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सोपा शॅम्पू हॅक देईल नैसर्गिक चमक

spot_img

चहा, कॉफी आणि कोरफडच्या मदतीने घरच्या घरी तयार करा प्रभावी हेअर वॉश

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बदललेला आहार, वाढते प्रदूषण आणि तणाव यांचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होत आहे. केस गळणे, अकाली पांढरे होणे, कोरडेपणा आणि केसांची नैसर्गिक चमक कमी होणे या समस्या आता सामान्य झाल्या आहेत. या त्रासापासून मुक्त होण्यासाठी अनेकजण महागडे शॅम्पू, सीरम आणि हेअर केअर प्रॉडक्ट्स वापरतात. मात्र, काही काळानंतर त्यांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.

अशा वेळी आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितलेला एक साधा आणि प्रभावी शॅम्पू हॅक केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. विशेषतः ज्यांचे केस खूप गळतात किंवा निस्तेज दिसतात, त्यांनी हा घरगुती हेअर वॉश नक्की वापरून पाहावा.

आयुर्वेदिक हेअर वॉश कसा तयार कराल?

सर्वप्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे चहापावडर घालून उकळा. पाणी अर्धे होईपर्यंत उकळल्यानंतर ते गाळून घ्या.
या तयार चहाच्या पाण्यात एक छोटी पॅकेट इन्स्टंट कॉफी मिसळा. त्यानंतर एक चमचा ताजे कोरफड जेल आणि तुम्ही नेहमी वापरत असलेला शॅम्पूचे तीन ते चार चमचे त्यात घाला. सर्व साहित्य चांगले मिसळून घ्या.

कसा वापर करावा?

सामान्य शॅम्पूऐवजी हा मिश्रण आठवड्यातून दोन वेळा केस धुण्यासाठी वापरा. केस धुताना हलक्या हाताने टाळूची मसाज करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा.

काय फायदे मिळतील?

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, चहापावडरमधील अँटिऑक्सिडंट्स केस गळती कमी करण्यास मदत करतात, तर कॉफी केसांची मुळे मजबूत करून नैसर्गिक चमक वाढवते. कोरफड जेलमुळे केसांना ओलावा मिळतो आणि कोरडे, राठ केस मऊ व रेशमी होतात.
नियमित वापर केल्यास काही आठवड्यांत केस गळती लक्षणीयरीत्या कमी झाल्याचा अनुभव येऊ शकतो. तसेच निस्तेज केसांमध्ये पुन्हा नैसर्गिक चमक दिसू लागते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ