spot_img

Hair Care : ‘या’ बियांचे सेवन केल्याने केसांच्या समस्यांपासून होईल सुटका

spot_img

केसांची वाढ (Hair Growth) चांगली व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा. पण सध्या केसांशी संबंधित समस्या वाढत चालल्यात. केसांच्या समस्यांवर एक चांगला आणि नैसर्गिक उपाय म्हणजे बिया. या बियांमुळे, शरीर निरोगी राहतंच, शिवाय केसांच्या वाढीलाही मदत होते. जवसाच्या बिया, चिया सीड्स (Flax Seeds) आणि भोपळ्याच्या बियांमधे ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजं आढळतात. यामुळे केसांच्या रोमांना पोषण मिळतंच आणि टाळूही निरोगी राहतो. या बियांमुळे, रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे केस लांब आणि जाड होतात.

केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकांचा साठा भोपळ्याच्या बियांमधे भरपूर प्रमाणात आहे. यात झिंक, मॅग्नेशियम, लोह आणि प्रथिनं असतात, केसांच्या वाढीसाठी हे घटक फायदेशीर मानले जातात. भाजून किंवा सूपमधे आणि सॅलडमध्ये घालून खाऊ शकता.जवसाच्या बियांमधे ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, केसांच्या रोमांचं यामुळे पोषण होतं. त्यामधे लिग्नान्स आणि अँटीऑक्सिडंट्स देखील मोठ्या प्रमाणात असतात, केसांच्या वाढीसाठी हे फायदेशीर आहेत.वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचा वापर होतो तसंच यातले ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे केसांच्या वाढीला चालना देण्यास मदत होते. स्मूदी किंवा दह्यात मिसळून खाऊ शकता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ