spot_img

Green Peas: मटार राहतील वर्षभर ताजेतवाने! थंडीतील मटार साठवण्याची जाणून घ्या सोपी घरगुती ट्रिक

spot_img

ब्लांचिंगच्या काही मिनिटांच्या प्रक्रियेनं मटार ६ ते ८ महिने फ्रीजरमध्येही राहतील हिरवेगार आणि स्वादिष्ट

हिवाळा आला की बाजारात सर्वात जास्त दिसणारी भाजी म्हणजे ताजी, हिरवीगार मटार. अनेक पदार्थांची चव वाढवणाऱ्या मटारचा पुरवठा मात्र इतर ऋतूंमध्ये कमी होतो. त्यामुळे थंडीतील ताज्या मटारचा साठा करून वर्षभर वापरता यावा, अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी घरच्या घरी करता येणार्‍या काही सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यास मटार दीर्घकाळ ताजे राहतात.

जर मटार फक्त ३ ते ४ दिवस वापरायचे असतील तर सोलून हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक बॅगमध्ये फ्रिजमध्ये ठेवा. त्यात पेपर टॉवेल ठेवल्यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जातो आणि मटार कोमेजत नाहीत.

परंतु मटार अधिक काळ साठवायचे असतील तर फ्रीजर सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी ब्लांचिंग प्रक्रिया आवश्यक आहे. प्रथम पाणी उकळून घ्या आणि त्यात सोललेले मटार केवळ २-३ मिनिटे टाका. लगेच ते काढून बर्फाच्या थंड पाण्यात घाला. यामुळे मटारचा हिरवा रंग आणि पोषक तत्वे टिकून राहतात. पूर्ण कोरडे झाल्यावर फ्रीजर बॅगमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवा.

या प्रकारे साठवलेल्या मटारचा रंग, स्वाद आणि टेक्स्चर ६ ते ८ महिन्यांपर्यंत उत्तम राहतो. मात्र आवश्यक तेवढेच मटार बाहेर काढा, पुन्हा गोठवणे टाळा. थोड्या कष्टात आणि योग्य पद्धतीचा अवलंब केल्यास हिवाळ्यातील ही प्रिय भाजी तुम्ही वर्षभर आनंदाने वापरू शकता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ