spot_img

Google Trends : कधी गुगलवर ‘67’ सर्च केलात का?

spot_img

*एका क्लिकवर स्क्रीन हलतेय? जाणून घ्या या भन्नाट ट्रिकमागचं रहस्य!

आजच्या डिजिटल युगात गुगलशिवाय आपलं पान हलत नाही, हे खरंय! जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातली माहिती असो किंवा शेजारच्या गल्लीतील पत्ता — सगळं काही गुगल एका क्लिकवर उपलब्ध करून देतं. म्हणूनच गुगल आपला रोजचा साथीदारच झाला आहे.

पण माहिती शोधण्यापलीकडेही गुगलमध्ये काही भन्नाट आणि मनोरंजक फीचर्स लपलेली आहेत, जी अनेकांना अजूनही माहिती नाहीत. त्यातलंच एक सध्या चांगलंच चर्चेत असलेलं फीचर म्हणजे गुगलवर “67” हा आकडा सर्च करणं.

‘67’ सर्च केल्यावर नेमकं काय होतं?

तुम्ही जर गुगलच्या सर्च बारमध्ये 67 टाइप करून सर्च केलं, तर काही क्षणांसाठी तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेटची स्क्रीन हलल्यासारखी दिसते. अचानक स्क्रीन हलू लागल्यामुळे अनेकजण चकित होतात आणि “हे नेमकं काय झालं?” असा प्रश्न पडतो.

विशेष म्हणजे ही ट्रिक फक्त कॉम्प्युटरपुरती मर्यादित नाही, तर स्मार्टफोनवरही तितक्याच मजेशीर पद्धतीने दिसते.

हे सुरक्षित आहे का? घाबरण्याचं कारण आहे का?

सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमुळे अशा गोष्टी पाहिल्यावर शंका येणं साहजिकच आहे. पण काळजी करू नका!
हे कोणतंही व्हायरस, हॅकिंग किंवा हार्डवेअर बिघाड नाही. हे गुगलचं अधिकृत आणि केवळ मनोरंजनासाठी असलेलं फीचर आहे. तुमच्या डिव्हाइसला यामुळे कुठलाही धोका नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ