Gold Silver Rate : जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी तेजीत; गुंतवणूकदारांना दिलासा

spot_img

जळगाव येथील सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. सोन्याच्या किंमतीत तब्बल २,६०० रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरातही सुमारे ३,००० रुपयांची भर पडली आहे.

सध्या जीएसटीसह सोन्याचा दर प्रति तोळा १,५०,३८० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो २,३९,९९० रुपयांपर्यंत गेला आहे. गेल्या महिनाभरापासून सतत घसरणीचा सामना करणाऱ्या या मौल्यवान धातूंनी गेल्या सहा दिवसांतच जोरदार पुनरागमन केले आहे.

फक्त सहा दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल ११,५०० रुपयांची वाढ झाली असून, चांदीतही सुमारे २०,००० रुपयांची वाढ झाली आहे. या अचानक वाढीमुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भाववाढीचा अंदाज लक्षात घेता पुढील काळात दर आणखी वाढू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ