spot_img

Gold Rate Today’s : घसरणीला ब्रेक! सोन्या-चांदीची जोरदार पुनरागमन, गुंतवणूकदारांमध्ये उत्साह

spot_img

डॉलर कमकुवत, बाँड उत्पन्न घटल्याने बुलियन मार्केट तेजीत; चांदीत तब्बल 8 हजारांची उसळी

गेल्या काही दिवसांपासून घसरणीच्या दबावाखाली असलेल्या सोन्या-चांदीने बुधवारी जोरदार कमबॅक केले. मजबूत आंतरराष्ट्रीय संकेत, अमेरिकन बाँड उत्पन्नातील घट आणि डॉलरच्या कमकुवतीमुळे कमॉडिटी बाजारात खरेदी वाढली. परिणामी, एमसीएक्सवर दोन्ही मौल्यवान धातूंनी लक्षणीय उसळी घेतली.

एमसीएक्सवर एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 1600 रुपयांहून अधिक वाढत प्रति 10 ग्रॅम 1,58,436 रुपयांवर पोहोचला. मार्च डिलिव्हरीसाठी चांदीत 2.6 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आणि दर 2,59,053 रुपये प्रति किलोवर गेला. पुढे ही तेजी कायम राहत चांदीने 2,60,557 रुपयांचा उच्चांक गाठला. सुरुवातीच्या सत्रातच चांदी सुमारे 8,009 रुपयांनी महागल्याचे दिसून आले.

आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजीचे वातावरण होते. स्पॉट सिल्व्हरमध्ये 2.2 टक्क्यांची वाढ होत तो 82.43 डॉलर प्रति औंसवर पोहोचला, तर स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी वाढून 5,049.59 डॉलर प्रति औंसवर गेला. अमेरिकन गोल्ड फ्युचर्समध्येही जवळपास 1 टक्क्यांची वाढ झाली. देशांतर्गत रिटेल बाजारातही दर वाढले. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,300 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,58,100 रुपयांवर गेला. चांदीत तर तब्बल 7,930 रुपयांची वाढ होऊन दर 2,61,220 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

या तेजीमागे काही प्रमुख कारणे स्पष्ट दिसत आहेत. अमेरिकन ट्रेझरी बाँड उत्पन्न घटल्याने बुलियनकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला. डिसेंबरमधील किरकोळ विक्रीची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमकुवत आल्याने अमेरिकन अर्थव्यवस्था मंदावल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीचा निर्णय घेईल, अशी अपेक्षा बाजारात व्यक्त होत आहे. व्याजदर घटल्यास नॉन-यिल्ड मालमत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोने आणि चांदी अधिक आकर्षक ठरतात. याशिवाय डॉलर निर्देशांक 0.15 टक्क्यांनी घसरून 96.66 वर आल्याने इतर चलनधारकांसाठी हे धातू तुलनेने स्वस्त झाले, ज्यामुळे खरेदीला आणखी चालना मिळाली. एकूणच, काही दिवसांच्या शांततेनंतर बुलियन मार्केटमध्ये पुन्हा तेजीत हालचाल सुरू झाल्याचे चित्र आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ