Gold Rate : सोने-चांदीच्या दरात जोरदार उसळी; 9 दिवसांची घसरण थांबली

spot_img

गेल्या काही दिवसांपासून सतत घसरत असलेल्या सोने आणि चांदीच्या किमतींना अखेर ब्रेक लागला असून दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये जोरदार वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात तब्बल 5.5 टक्क्यांची वाढ झाली असून किंमत सुमारे 12 हजार रुपयांनी वाढून प्रति किलो 2.36 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर सोन्याच्या दरातही 4 टक्क्यांची वाढ झाली असून 10 ग्रॅमसाठी किंमत सुमारे 1.44 लाख रुपयांवर पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. डॉलर कमजोर होणे, कच्च्या तेलाच्या किमती कमी होणे आणि जागतिक तणाव कमी होण्याचे संकेत ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सोन्याचा दर 2 टक्क्यांहून अधिक वाढून प्रति औंस 4568 डॉलरच्या आसपास पोहोचला आहे, तर चांदीतही जवळपास 4 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य संघर्ष कमी होण्याच्या चर्चेमुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्याकडे वळल्याचे दिसून येते. अमेरिकेकडून शांततेसाठी राजनैतिक प्रयत्न सुरू असल्याचे संकेत देण्यात आले असून त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

तज्ज्ञांच्या मते, डॉलर निर्देशांकातील घसरण आणि कच्च्या तेलाच्या दरातील बदल यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थिती अजूनही पूर्णपणे स्थिर नसल्याने बाजारात अनिश्चितता कायम आहे. युद्धजन्य परिस्थिती, तेलाचे दर आणि व्याजदर या घटकांवर भविष्यात सोने-चांदीच्या किमतींचे चित्र ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ