गायीच्या दुधापेक्षाही बकरीचे दूध आहे सर्वोत्तम!
गायी, म्हशीचे दूध पिणे सामान्य गोष्ट आहे. पण अनेकजण बकरीचे दूधही पितात. याशिवाय ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बकरीचे दूध (Goat’s milk) विविध औषधी गुणांनी समृद्ध असते. पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये याचा वापर केला जातो. आयुर्वेदातही बकरीचे दूध आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. डॉक्टरदेखील अनेक आजारांमध्ये बकरीचे दूध पिण्याचा सल्ला देतात. मात्र काहींना याचा वास आवडत नाही, त्यामुळे ते प्यायचे टाळतात. शेळीचे दूध अत्यंत गुणकारी असून विशेषतः लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी चांगले असते. तसेच आजारी, पचनशक्ती चांगली नसणारी आणि वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी एक संपूर्ण आहार म्हणून शेळीचे दूध उपयोगी ठरते. हृदयरोग असणाऱ्यांसाठी शेळीचे दूध हे अत्यंत गुणकारी मानले जाते. शेळीचे दूध हे रोगप्रतिकारक शक्ती (immune system) वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.तज्ज्ञांच्या मते, बकरीचे दूध गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे पिणे शक्य आहे. हिवाळ्यात थोडे गरम करून प्यावे, यामुळे पचन सुधारते आणि झोप चांगली लागते. उन्हाळ्यात दूध उकळून थंड करून प्यावे.
- हाडे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे:
बकरीच्या दुधात कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन D मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. संधिवात, सांध्यांचा त्रास आणि अकड कमी होऊन लवचिकता वाढते. तसेच सेलेनियम आणि झिंक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
- पचनसंस्थेच्या समस्या:
बकरीच्या दुधातील सूक्ष्म चरबीचे कण आणि A2 कॅसिन प्रथिन पचनक्रिया सुधारतात. त्यामुळे गॅस, अपचन, आम्लपित्त इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.
- सूज आणि वेदना कमी करणे:
बकरीच्या दुधात दाहशामक (anti-inflammatory) गुणधर्म आहेत. त्यामुळे स्नायू आणि ऊतींमधील सूज कमी होते आणि वेदना कमी होतात.
- डेंग्यूचा आजार:
डेंग्यू झाल्यावर शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. अशा वेळी बकरीचे दूध पिल्यास प्लेटलेट्सची संख्या वाढते, असे मानले जाते. ते पूर्ण बरे करत नसले तरी रुग्णाच्या आरोग्य सुधारण्यास मदत करते.
- रक्तातील कमतरता भरून काढणे:
जर शरीरात लोह (आयरन) कमी असेल तर बोकडाचे दूध फायदेशीर ठरते. हे रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते आणि रक्ताल्पता दूर करते.




