spot_img

Goa News : साधुसंतांच्या उपस्थितीत गोव्यात 500 जणांनी केली हिंदू धर्मात ‘घरवापसी’

spot_img

आज देशभरात मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री साजरी केली जात आहे. याच शुभमुहूर्तावर गोव्यातील पणजी येथील ३० वाडी परिसरात देव गोवेश्वर महाशिव मंदिरात भव्य धार्मिक सोहळा पार पडला. या सोहळ्यात सुमारे ५०० बांधवांनी हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमास जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न झाले. यावेळी आखाडा परिषदेतील प्रमुख साधुसंत आणि महंतांच्या साक्षीने वेदपठण, हवन आणि पारंपरिक हिंदू विधी पार पडले.

देव गोवेश्वर महाशिव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.आयोजकांच्या माहितीनुसार, सुमारे ३०० बांधवांनी औपचारिकरीत्या ‘घरवापसी’ केली, तर इतर २०० जणांनीही हिंदू धर्म स्वीकारत एकूण संख्या ५०० वर पोहोचली. देशभरातील विविध आखाड्यांतील संत-महंत या सोहळ्यासाठी उपस्थित होते.महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे गोवा राज्यात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून या सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे..

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ