spot_img

Ghansoli : घणसोलीत महावितरणच्या फिडरला लागली आग, घणसोलीतील बत्ती बारा तास गूल

spot_img

विजय गायकवाड ( नवी मुंबई )

घणसोली (Ghansoli) येथील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या महावितरणच्या फिडर (dp ) ला बुधवारी रात्री 12:30 वाजता अचानक आग लगली यांची माहिती गावातील समाजसेवक मयूर मढवी यांना कळताच मढवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोब धाव घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु जवळ आग विजवण्याचे साधन नसल्याने मयूर मढवी यांनी ताबडतोब कोपरखैरणे येथील अग्निशमन दल केंद्रास याची माहिती दिली. त्यावेळी कोपरखैरने अग्नीशमन दल केंद्राचे सहाय्यक केंद्र अधिकारी पुरुशोत्तम गरड यांनी आपल्या जवानासोबत आल्या नंतर थोड्या वेळातच जवानानी आग आटोक्यात आणली.

परंतु या फिडरला आग लागल्यामुळे घणसोली गावातील विद्युतपुरवठा सुमारे 12/13 तास खंडीत झाला होता. यामुळे गृहिणींना नाहक त्रास सहन करावा लागला. सकाळी मुलांना शाळेत पोहचवायचे असल्याने वीज नसल्याने पाणी पुरवठा झाला नाही. यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी फिडरची वीज वाहिनी बदलून दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरळीत केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ