spot_img

Gautami Patil : ‘लाडकी बहीण’ योजनेवर आधारित मराठी चित्रपट 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

spot_img

समाजातील घडामोडींवर भाष्य करणारे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. अशाच एका वेगळ्या विषयावर आधारित ‘लाडकी बहीण’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय ‘लाडकी बहीण’ योजनेची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट 17 एप्रिल रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन शीतल शिंदे यांनी केले असून निर्मिती शनिदेव फिल्म्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद गणेश शिंदे यांनी लिहिले आहेत, तर बाबासाहेब पाटील कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहत आहेत.

या चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, उषा नाईक, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार, सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विशावकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, गणेश शिंदे, दर्शना जोकरे, मेगा शिंदे आदी कलाकार आहेत. चित्रपटात एका शासकीय योजनेमुळे सर्वसामान्य महिलांच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल होऊ शकतो, याचे चित्रण करण्यात आले आहे. आर्थिक मदतीमुळे गृहिणी एकत्र येऊन आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा विकास कसा साधतात, हा चित्रपटाचा महत्त्वाचा मुद्दा आहे.

सामाजिक विषयावर हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत भाष्य करताना विषयाचे गांभीर्यही जपण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. दमदार कथा, लक्षवेधी अभिनय, सुमधूर गाणी आणि नृत्य यामुळे हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाची मेजवानी ठरेल, असा विश्वास दिग्दर्शिका शीतल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ