‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’मुळे घराघरात पोहोचलेला आणि ‘फिल्टरपाड्याचे बच्चन’ म्हणून ओळखला जाणारा गौरव मोरे सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतंच गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आली असून, त्याचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव मोरेने प्रियंका करेकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे, या लग्नाबाबत गौरवने स्वतः कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र अभिनेत्री Rutuja Bagwe हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसमोर आणली.
ऋतुजाने इंस्टाग्रामवर दोघांसोबतचा फोटो पोस्ट करत “मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमच्या नव्या आयुष्याच्या आणि नव्या घराच्या सुरुवातीस खूप शुभेच्छा,” असा संदेश दिला. या पोस्टमुळे गौरवच्या लग्नाचं गुपित उघड झालं. गौरवच्या या सरप्राईजमुळे त्याचे चाहते आनंदित झाले असून, सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




