spot_img

Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या घरी फराह खानची खास भेट; राजकारणापलीकडचा गडकरींचा सिनेप्रेमी अंदाज समोर

spot_img

फराह खानच्या व्लॉगमधून गडकरींच्या शासकीय निवासस्थानील गप्पा, स्वयंपाक आणि आवडत्या कलाकारांची खुली कबुली

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे राजकारणातील प्रदीर्घ अनुभवासाठी ओळखले जातात. मात्र अलीकडेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू समोर आला आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) यांनी पहिल्यांदाच एखाद्या राजकीय नेत्याच्या घरी भेट देत खास व्लॉग शूट केला आणि तो थेट नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी.

फराह खान आपल्या युट्युब व्लॉगमध्ये सेलिब्रिटींच्या घरी जाऊन, तिचा स्वयंपाकी दिलीप यांच्या मदतीने खास पदार्थ बनवते आणि गप्पांचा रंग जमवते. कमी कालावधीतच या अनोख्या संकल्पनेमुळे फराह खान प्रचंड लोकप्रिय झाली आहे. याच मालिकेत पहिल्यांदाच एका केंद्रीय मंत्र्याच्या घरी ती पोहोचली.

या खास भेटीसाठी नितीन गडकरी यांच्या पत्नीही नागपूरहून दिल्लीत आल्या होत्या. फराह खानने गडकरी दाम्पत्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, स्वादिष्ट पदार्थ तयार केले आणि प्रेक्षकांना गडकरींच्या शासकीय निवासस्थानाची आतून झलक दाखवली.

गप्पांच्या ओघात फराह खानने गडकरींना थेट प्रश्न विचारला – “तुम्ही चित्रपट पाहता का?” यावर उत्तर देताना गडकरी म्हणाले, “हो, आमच्या घरी थिएटर आहे.” त्यांनी ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट पाहिल्याचेही सांगितले. आवडता अभिनेता कोण, या प्रश्नावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले.

अभिनेत्रीबाबत विचारले असता गडकरी म्हणाले, “रजनीगंधा चित्रपटातील विद्या सिन्हा मला खूप आवडायची.” मात्र त्यांना वाटत होते की विद्या सिन्हा आता हयात नाहीत. यावर फराह खानने थोडा संभ्रम व्यक्त केला. गडकरी यांनी सांगितले की, स्मृती इराणी यांनी तसे सांगितले होते. विद्या सिन्हा यांनी ‘छोटी सी बात’, ‘पती पत्नी और वो’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम केले होते, हेही त्यांनी आठवणीने नमूद केले.

या व्लॉगमुळे नितीन गडकरी यांचा साधेपणा, सिनेप्रेम आणि घरगुती स्वभाव प्रेक्षकांसमोर आला असून, राजकारणापलीकडेही ते किती मनमोकळे आहेत याची झलक पाहायला मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ