spot_img

Erectile Dysfunction : रात्रीच्या झोपेकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांमध्ये नपुंसकतेचा धोका वाढतोय!

spot_img

आजच्या वेगवान आयुष्यात झोप ही जणू काही ऐषारामाची गोष्ट बनली आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल स्क्रोल करणे, ऑफिसचं काम आटोपणे, सोशल मीडियावर तासन्तास घालवणे किंवा मित्रांसोबत पार्टी करणे, यामुळे झोपेचा बळी जातोय. पण ही झोपेची कमतरता केवळ थकवा किंवा चिडचिड वाढवत नाही, तर पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे.संशोधन सांगतं की, पुरेशी झोप न घेतल्याने पुरुषांमध्ये नपुंसकता, म्हणजेच इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या वाढते. रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं, विशेषतः टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं. याचा थेट परिणाम लैंगिक क्षमतेवर होतो.

एनसीबीआयच्या एका अहवालानुसार, जे पुरुष रोज 5-6 तासांपेक्षा कमी झोप घेतात, त्यांच्यात नपुंसकतेचा धोका दुपटीने वाढतो. सततच्या झोपेच्या अभावामुळे रक्तप्रवाहावरही परिणाम होतो, जो लैंगिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.याशिवाय, स्लीप एपनिया ही झोपेत श्वास अडकण्याची समस्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. यामुळे झोप अपूरी राहते आणि लैंगिक आरोग्यावर वाईट परिणाम होतात. तसंच, वयस्कर पुरुषांमध्ये लोअर यूरिनरी ट्रॅक्ट सिंड्रोम (LUTS) मुळे वारंवार लघवीला जावं लागणं किंवा मूत्राशय पूर्ण रिकामं न होणं यासारख्या समस्या झोपेची गुणवत्ता खराब करतात. याचा परिणाम म्हणून नपुंसकतेचा धोका आणखी वाढतो.झोपेच्या अभावाचा शुक्राणूंच्या निर्मितीवरही परिणाम होतो, ज्यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम दिसतो. अपुरी झोप शरीराच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेला खीळ घालते, ज्याचा एकूण आरोग्यावर आणि विशेषतः लैंगिक स्वास्थ्यावर परिणाम होतो.

झोप सुधारण्यासाठी काही सोप्या टिप्स:

पायांचा मसाज: झोपण्यापूर्वी पाय किंवा तळपायांचा हलका मसाज करा. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो.

हळदीचं दूध: रात्री हळदीचं दूध प्या. हे नैसर्गिकरित्या झोप चांगली आणण्यास मदत करतं.

शांत वातावरण: झोपण्यासाठी अंधारं आणि शांत खोली निवडा. तेजस्वी प्रकाश आणि आवाज टाळा.

मोबाईलपासून ब्रेक: झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल वापर बंद करा.

नियमित वेळ: रोज एकाच वेळी झोपणं आणि उठणं यामुळे झोपेची सवय सुधारते.

झोप ही शरीरासाठी ‘रिचार्ज’सारखी आहे. अपुऱ्या झोपेमुळे शरीराच्या प्रत्येक यंत्रणेवर परिणाम होतो आणि लैंगिक आरोग्यही त्याला अपवाद नाही. म्हणूनच, दररोज 7-8 तासांची पुरेशी झोप घेणं ही केवळ सवय नाही, तर तुमच्या आरोग्यासाठी गरज आहे!

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ