spot_img

Epstein Files : एपस्टीन फाईल्समधून धक्कादायक फोटो आणि संदेश उघड; ‘लोलिता’ कादंबरीचा कथित कोडवर्ड म्हणून वापर?

spot_img

हाऊस ओव्हरसाईट डेमोक्रॅट्सकडून जाहीर झालेल्या नव्या पुराव्यांमुळे उच्चभ्रू व्यक्तींच्या संपर्कांवर प्रश्नचिन्ह

अमेरिकेतील हाऊस ओव्हरसाईट डेमोक्रॅट्स समितीने गुरुवारी जाहीर केलेल्या नव्या फोटोंच्या आणि संदेशांच्या मालिकेमुळे जेफ्री एपस्टीन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती महिलांसोबत दिसत आहेत. मात्र, या फोटोंतील उपस्थिती म्हणजे संबंधित व्यक्ती थेट लैंगिक शोषण प्रकरणात सहभागी होत्या, असे ठामपणे म्हणता येणार नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे.

या नव्या फोटोंपैकी काही चित्रांमध्ये व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या वादग्रस्त कादंबरी ‘लोलिता’मधील ओळी तरुण मुलींच्या पायांवर, मानेवर आणि पाठीवर लिहिलेल्या दिसून येतात. एका फोटोमध्ये ‘लो-लि-ता : जिभेच्या अग्रभागाचा प्रवास’ असे कॅप्शनही आढळले आहे. समिती सदस्यांच्या मते, या ओळी केवळ साहित्यिक संदर्भ नसून, त्या संकेतात्मक कोडवर्ड म्हणून वापरल्या गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका छायाचित्रात ‘लोलिता’ ही कादंबरी थेट बेडवर ठेवलेलीही दिसते.

या फाईल्समध्ये समोर आलेले संवाद अधिक गंभीर स्वरूपाचे आहेत. एका संदेशात १८ वर्षांच्या मुलीचे ‘रेट’ ठरवण्याबाबत चर्चा झाल्याचे स्पष्ट होते. त्या संवादात मुलीचे नाव, वय, उंची, वजन, शारीरिक मोजमाप तसेच येण्याजाण्याची वेळ यांचा तपशील नमूद आहे. काही मुली रशियातील असल्याचेही या संदेशांतून समोर आले आहे. ‘मी सध्या दुसरी कुणी पाठवू शकत नाही’ किंवा ‘ती १००० डॉलरची मागणी करत आहे’ अशा वाक्यांमुळे या प्रकरणाचे स्वरूप अधिक धक्कादायक बनले आहे.

समितीच्या माहितीनुसार, जेफ्री एपस्टीनने आपल्या प्रभावशाली वर्तुळाचा गैरवापर करून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले, असा गंभीर आरोप आहे. या शोषणामुळे अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. एपस्टीनवर बड्या नेत्यांना, उद्योगपतींना आणि श्रीमंत व्यक्तींना या मुली पुरवण्याचे आरोपही करण्यात आले आहेत.

एपस्टीनला यापूर्वी १३ महिन्यांचा कारावास झाला होता. मात्र, नव्या आरोपांनंतर २०१९ मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. त्याच वर्षी तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला, ज्याबाबत अधिकृतरित्या आत्महत्येचा दावा करण्यात आला आहे. तरीही, या प्रकरणाभोवतीचे गूढ आणि संशय आजही कायम आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ