spot_img

Eknath Khadse on Bopodi Land Scam : “पुण्यातील जमीन घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश; माजी मंत्री एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप”

spot_img

बोपोडीतील 1500 कोटींच्या सरकारी जमिनीवर बनावट कागदपत्रांद्वारे कब्जा करण्याचा प्रयत्न; लँड माफियांचा ‘हार्ट ऑफ सिटी’मध्ये डाव

पुण्यातील बोपोडी परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणावर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठा खुलासा करत, लँड माफियांनी शासनाच्या मालकीची जमीन बेकायदेशीरपणे बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

खडसे यांनी सांगितले की, ही जमीन सुमारे 5 लाख 75 हजार चौरस फुटांची, म्हणजेच जवळपास 5 एकर क्षेत्रफळाची असून, तिची सध्याची बाजारमूल्ये तब्बल 1500 कोटी रुपये इतकी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, ही जमीन 1883 पासून कृषी खात्याच्या ताब्यात असून, शासनाच्या नावावर नोंद आहे.

इतिहास उलगडताना खडसे म्हणाले की, पेशव्यांच्या काळात ही जमीन ‘विध्वंस आणि भट’ या कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी देण्यात आली होती, पण त्या जमिनीवरील हक्काची अट मुलगा होईपर्यंतच होती. नंतर ही जमीन पुन्हा शासनाकडे जमा झाली आणि 1920 साली कृषी विद्यापीठाच्या नावावर करण्यात आली.

मात्र, अलीकडेच काही व्यक्तींनी हेमंत गावंडे, शीतल तेजवानी आणि इतरांनी बनावट कागदपत्रे तयार करून स्वतःला त्या जमिनीचे कुळ किंवा मालक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. “शासनाच्या वहिवाटीत असलेली आणि कृषी खात्याच्या ताब्यातील जमीन बोगस कागदपत्रांनी लाटण्याचा प्रयत्न हा राज्यातील सर्वात मोठ्या जमीन घोटाळ्यांपैकी एक आहे,” असा ठाम दावा खडसेंनी केला.

साखर भवन आणि कृषी विद्यालयासारख्या महत्त्वाच्या संस्थांच्या शेजारी असलेली ही जमीन हार्ट ऑफ द सिटी’ मध्ये असल्याने तिचे व्यापारी मूल्य प्रचंड आहे. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू आहे. खडसे यांच्या या खुलाशामुळे पुण्यातील जमीन व्यवहारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ