spot_img

Honey : थंडीमध्ये १ चमचा मध खा आणि या मोठ्या रोगांपासून धोका टाळा..

spot_img

आपले शरीर हे निसर्ग चक्राप्रमाणे चालत असते. त्यानुसार आपण आपला आहार, आपली जीवनशैली बदलत असतो. आत्ता थंडीचा महिना येणार आहे. त्यानुसार हिवाळ्यामध्ये आपण आपली तब्येत आणि आहार संतुलित ठेवावा. हिवाळ्यात आपल्या शरीराचे तापमान कमी होते, ज्यामुळे आपल्या शरीरात रोगाचा शिरकाव होतो. ज्यांचं आरोग्य सतत आजारी असत त्यांनी या महिन्यात विशेष काळजी घ्यावी. हिवाळ्यात सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि अशक्तपणा हे आजार जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात. त्यामुळे, दररोज फक्त एखादा चमचा मध (Honey) खाल्ल्याने आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात.मध (Honey) हा केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठी हि फायद्याचं आहे.

आयुर्वेद तज्ज्ञ असं सांगतात, मधामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल (Antioxidant and antibacterial) गुणधर्म असतात. मधातील हे गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात त्याबरोबरच विषाणूंशी लढण्याची क्षमता हि वाढवतात. हिवाळ्यात, लोकांना सर्दी आणि फ्लू आणि असे बरेच संसर्गजन्य रोगांचा सामना करावा लागतो. म्हणून असं सकाळी रिकाम्या पोटी रोज 1 चमचा मध खाल्ल्याने संसर्गाचा धोका कमी होतो. इतकेच नव्हे तर मध घशातील खवखव कमी करतं आणि खोकल्यापासून आराम हि देतं. शरीरासाठी हा एक उत्तम उपाय मानला जातो. जर आपण झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केले तर खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होते आणि चांगली झोप ही येते.

हृदयाच्या आरोग्यासाठी मधाचे सेवन देखील फायदेशीर आहे. त्यातील नैसर्गिक साखर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे बऱ्याप्रमाणात कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करताट. रक्त प्रवाह सुधारवायचा असेल तर दररोज एक चमचा मध आणि कोमट पाणी प्या याने हृद्यविकाराचा हि धोका टळतो. मध पचनासाठी हि गुणकारी आहे. ते पोटातील हानिकारक बॅक्टेरिया हि नष्ट करते. बद्धकोष्ठता किंवा पोटात जडपणा यावर हि मध घेणे फायदेशीर आहे आणि कोमट पाण्यासोबत मध घेतल्याने पोट स्वच्छ राहते आणि अन्न चांगले हि पचते.

हिवाळ्यात, आपले शरीरा सुस्त बनते, शरीरात आळस निर्माण होतो. अशा वेळी, सकाळी एक चमचा मध घेतल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते आणि तुम्ही ताजे राहता व थकवा हि कमी होतो. हिवाळ्यात तुमच्या दैनंदिन जीवनात मधाचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे अनेक आजारांपासून तुम्हालाआराम मिळवू शकता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ