Donald Trump : जर्मनीचा अमेरिकेला मोठा ‘दणका’ तर हुती बंडखोरांच्या एन्ट्रीने इस्रायल हादरले!

spot_img

डोनाल्ड ट्रम्प यांची डोकेदुखी वाढली; ४० हजार अमेरिकन सैनिकांना मायदेशी धाडण्याची जर्मनीतून मागणी

सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा वणवा आता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेऊ लागला आहे. अमेरिकेच्या युद्धखोरीमुळे जगभरातील देश संताप व्यक्त करत असून, आता खुद्द अमेरिकेचे मित्र देश आणि ‘नाटो’ (NATO) सदस्यही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज असल्याचे दिसत आहे. इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मूज’ बंद केल्यानंतर ट्रम्प यांनी मदतीचे आवाहन केले होते, परंतु एकाही मित्र देशाने त्यांना साथ दिली नाही. त्यातच आता जर्मनीमधून अमेरिकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जर्मनीतील ‘अल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनी’ या पक्षाने आपल्याच सरकारकडे मागणी केली आहे की, देशातील अमेरिकेचे सर्व ४० हजार सैनिक आणि त्यांचे लष्करी तळ तातडीने हटवण्यात यावेत. परराष्ट्र धोरणावर अमेरिकेचा प्रभाव नको, असा आक्रमक पवित्रा आता जर्मनीने घेतल्याने ट्रम्प प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे.

दुसरीकडे, पश्चिम आशियातील युद्धाने आता भयानक वळण घेतले आहे. इराणच्या समर्थनासाठी हुती बंडखोर प्रत्यक्ष मैदानात उतरले असून त्यांनी येमेनमधून थेट इस्रायलवर मिसाईल हल्ला चढवला आहे. या हल्ल्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढली असून, हुती बंडखोरांनी जर ‘सुएझ कालवा’ वाहतुकीसाठी बंद केला, तर जागतिक व्यापार पूर्णपणे कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मूज’ रोखल्यामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत आणि आता सुएझ कालव्यावर संकट आल्यास संपूर्ण जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो. मित्र देशांची नाराजी आणि नव्या शत्रूंचे आव्हान यामुळे अमेरिका सध्या दुहेरी संकटात सापडली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ