spot_img

Dombivli News : घाटकोपरहून डोंबिवलीपर्यंतचा प्रवास शेवटी का ठरला घातक?

spot_img

42 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह खोलीत आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित

डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरातील एका लॉजमध्ये आत्महत्येची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लॉजच्या खोलीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून, याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव योगेश राधी कदम (वय 42) असून ते मुंबईतील घाटकोपर परिसरातील रहिवासी होते. गुरुवारी रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास योगेश डोंबिवलीतील संबंधित लॉजमध्ये दाखल झाले होते. रात्री जेवणानंतर ते आपल्या खोलीत थांबले होते.

शुक्रवारी सकाळी बराच वेळ झाला तरी खोलीचा दरवाजा उघडला न गेल्याने लॉज कर्मचाऱ्यांना संशय आला. दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तो उघडला असता, खोलीत योगेश यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.

विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात योगेश हे आर्थिक अडचणी आणि कर्जबाजारीपणाला सामोरे जात होते, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण काय याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ