spot_img

Disadvantages of tattooing : टॅटूची क्रेझ वाढली… पण वाढतोय स्किन कॅन्सरचा धोका?

spot_img

स्वीडनमधील संशोधनाने उघड केला टॅटू इंक व मेलानोमा यामधील संभाव्य संबंध

टॅटू करण्याची फॅशन सध्या तरूणांपासून मोठ्यांपर्यंत जोरात वाढताना दिसत आहे. हात, मान, पाठ किंवा शरीराच्या इतर भागांवर आकर्षक डिझाइनचे टॅटू काढून व्यक्तिमत्त्व उठून दिसावं, अशी अनेकांची इच्छा असते. सामान्यतः टॅटू केल्याने आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही, मात्र स्वीडनमधील एका अलीकडील संशोधनाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

या अभ्यासातून असे आढळले आहे की, टॅटू असलेल्या व्यक्तींमध्ये ‘मेलानोमा’ या त्वचेच्या कर्करोगाचा धोका टॅटू नसलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त दिसून आला. 20 ते 60 वयोगटातील जवळपास 2,880 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला होता, ज्यांपैकी सर्वांना मेलानोमा झाला होता. त्यामध्ये विशेषतः 10 वर्षांहून जास्त जुने टॅटू असणाऱ्या व्यक्तींमध्ये धोका तुलनेत वाढलेला दिसला.

संशोधनात स्पष्ट झाले की टॅटूसाठी त्वचेत इंजेक्ट केली जाणारी इंक शरीराला ‘बाहेरील हानिकारक घटक’ म्हणून जाणवते. त्यामुळे इम्यून सिस्टम सक्रिय होते आणि या रंगकणांना वेढण्याचा प्रयत्न करते. काही इंजेक्शन इंकमध्ये असलेले घटक पुढे जाऊन शरीरातील पेशींवर परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत जर टॅटू असलेला भाग सतत व तीव्र सूर्यप्रकाशात राहत असेल, तर जोखीम आणखी वाढू शकते.

तथापि, संशोधकांनी स्पष्ट केले आहे की टॅटूमुळेच कॅन्सर होतो, असे ठोस पुरावे अजूनही नाहीत. टॅटू असलेल्या व नसलेल्या लोकांमध्ये जोखीमेमध्ये फरक दिसला आहे. पण त्यांचा थेट संबंध सिद्ध झालेला नाही.

त्यामुळे टॅटू घेतल्यास शरीरावरचा तो भाग सूर्यप्रकाशात दीर्घकाळ उघडा न ठेवणे, सनस्क्रीन वापरणे आणि आवश्यक तेव्हा त्वचा तपासून घेणे, अशी काळजी घेण्याचा सल्ला हा अभ्यास देतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ