spot_img

Dipika kakar : पेट स्कॅनसाठी रुग्णालयात पोहोचली अभिनेत्री,पतीने दिली हेल्थ अपडेट

spot_img

दीपिका भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

अभिनेत्री दीपिका कक्कर (Deepika Kakkar) गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करतेय. दीपिकाला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास 13 ते 14 तास तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेनंतर दीपिकाच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. हळूहळू ती बरी होत आहे. अजूनही ती औषधांवरच आहे. नुकताच दीपिकाचा सर्जरीनंतरचा पहिला पेट स्कॅन (PET) करण्यात आला. पती शोएब इब्राहिमसोबत ती पेट स्कॅनसाठी रुग्णालयात पोहोचली होती. शोएबने युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातून दीपिकाच्या आरोग्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना दिले आहेत.

पेट स्कॅनपूर्वी दीपिका थोडी भावूक झाली होती. शोएबने तिला धीर दिला. “तुम्ही कितीही स्ट्राँग असला तरी अशा वेळी भीती वाटतेच. काळजी करू नकोस, सर्वकाही ठीक होईल”, असं आश्वासन तो तिला देतो. तेव्हा दीपिकासुद्धा म्हणते, “होय, थोडीतरी भीती वाटतेच.” पेट स्कॅनच्या आधी दीपिकाने काही ब्लड टेस्ट केले होते. दीपिका आणि शोएब यांना एक मुलगा आहे. मुलाला सांभाळत आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणं थोडं कठीण असल्याचंही तिने एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं.

शोएबशी लग्न केल्यानंतर दीपिकाने अभिनयातून ब्रेक घेतला. त्याऐवजी ती कपड्यांचा आणि दागिन्यांचा व्यवसाय करतेय. यासोबतच ती तिच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देत आहे. युट्यूब चॅनलवर ती विविध व्लॉग्सच्या माध्यमातून चाहत्यांना सतत अपडेट्स देत असते. काही दिवसांपूर्वी ती तिच्या सासरच्या गावी गेली होती. तिथले फोटो आणि व्हिडीओ तिने पोस्ट केले होते. तिथून मुंबईत परतताच ती पतीसोबत पेट स्कॅनसाठी गेली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ