spot_img

Dhurandhar The Revenge : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ चा टिझर येताच सोशल मीडियावर धुमाकूळ

spot_img

सगळ्यांना ज्याची प्रतीक्षा होती त्या धुरंधर फिल्मच्यी सीक्वेलचा टिझर अखेर आला आहे. आज मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी, रणवीर सिंहने चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं. त्याच्या पोस्टमध्ये त्याने दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी टिझर येईल असं सांगितलं. तेव्हापासून सगळेजण टिझर कधी प्रदर्शित होतो याची वाटच पाहत होते. अखेर हा टिझर आला आहे.

‘ये नया हिंदुस्तान है, ये घर मे घुसेगा भी और मारेगा भी’ अशा वाक्यासह अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धुरंधर फिल्मच्या सीक्वेलचा टिझर पोस्ट केला आहे. धुरंधर फिल्मच्या सीक्वेलचं नाव धुरंधर 2 (Dhurandhar 2) नाही तर धुरंधर : द रिव्हेंज असं आहे. रणवीर सिंहच्या धुरंधर फिल्मच्या दुसऱ्या भागाच्या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. रणवीर सिंहचा लूक प्रेक्षकांना अधिक आवडला आहे. धुरंधरने आत्तापर्यंत जगभरात बॉक्स ऑफिसवर 1300 कोटी रुपये कमावले आहेत. हा रणवीर सिंगचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही बनला आहे. या फिल्मनंतर प्रेक्षका आता धुरंधर द रिव्हेंज ही फिल्म19 मार्च 2026ला रिलीज होणार आहे. फिल्मचा हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर काय जादू करते याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ