Dhurandhar 2 : धुरंधर: द रिव्हेंज चे तिकीट मिळवण्यासाठी साक्षात सुनील गावस्करही रांगेत

spot_img

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने बॉक्स ऑफिसवर आणले वादळ

देशात सध्या आयपीएल २०२६ आणि इराण युद्धाच्या चर्चा रंगत असतानाच, अभिनेता रणवीर सिंहच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने मनोरंजनाच्या जगात सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-ॲक्शन चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत ५०० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडून बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाची क्रेझ इतकी जबरदस्त आहे की, चक्क भारतीय क्रिकेटचे महानायक सुनील गावस्कर यांनाही तिकीट मिळवण्यासाठी कसरत करावी लागली. चित्रपटातील अभिनेते राकेश बेदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, गावस्कर यांनी स्वतः त्यांना फोन करून तिकीटांची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. “राकेशजी, मला तिकीट मिळत नाहीये, प्लीज काहीतरी करा,” अशा शब्दांत गावस्करांनी आपली अडचण मांडली.

केवळ क्रिकेटचे दिग्गजच नव्हे, तर आयपीएलमधील स्टार खेळाडूही या ‘धुरंधर’ तापाने फणफणले आहेत. गुजरात टायटन्सचे शिलेदार अहमदाबादमध्ये तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मल्टिप्लेक्समध्ये या सिनेमाचा आनंद घेताना दिसले. पहिल्या भागाने १३०० कोटींची कमाई करून जो विक्रम प्रस्थापित केला होता, तो आता हा दुसरा भाग मोडेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड लागले असून, सोशल मीडियावर ‘स्पॉयलर’ शेअर न करण्याचे आवाहन कलाकार करत आहेत. एकूणच, हा चित्रपट केवळ मनोरंजन न राहता एक राष्ट्रीय इव्हेंट बनला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ