spot_img

Dhurandhar 2 : धुरंधर 2’च्या सेटवरील फोटो लीक; अर्जुन रामपालच आहे का कथेतला रहस्यमय बडे साहब?

spot_img

थिएटर-ओटीटीवर धुमाकूळ घालणारा ‘धुरंधर’; आता ‘बडे साहब’च्या ओळखीवरून चर्चांना उधाण

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 58 दिवस पूर्ण केले असले, तरी त्याची कमाई अजूनही सुरूच आहे. विशेष म्हणजे थिएटरमध्ये यशस्वी वाटचाल सुरू असतानाच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि अवघ्या 24 तासांत भारतातील सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला. या यशानंतर आता प्रेक्षकांचं लक्ष ‘धुरंधर 2’ कडे लागलं असून, हा सीक्वेल 19 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

पहिल्या भागात सतत उल्लेख होऊनही ज्याचा चेहरा कधीच न दाखवलेला ‘बडे साहब’ नेमका कोण, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मात्र आता ‘धुरंधर 2’च्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाले असून, त्यातून या गूढ पात्राबाबत नवे अंदाज बांधले जात आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अर्जुन रामपाल आणि संजय दत्त एका बाल्कनीत उभे राहून संवाद साधताना दिसतात. चित्रपटात संजय दत्त एसपी असलम चौधरीच्या भूमिकेत, तर अर्जुन रामपाल आयएसआयचा मेजर इक्बाल साकारताना दिसणार आहे. हा फोटो समोर येताच अनेक चाहत्यांनी असा दावा केला आहे की अर्जुन रामपालच कथेतला बडे साहब असू शकतो, कारण या सीनमध्ये एसपी असलम थेट त्याला भेटायला जातो.

मात्र काही प्रेक्षक या मताशी सहमत नाहीत. त्यांच्या मते मेजर इक्बाल सतत एखाद्या तिसऱ्या, अधिक शक्तिशाली व्यक्तीचा उल्लेख करताना दिसतो, त्यामुळे तो स्वतः बडे साहब असण्याची शक्यता कमी आहे.

पहिल्या भागात दाखवलेल्या कथेनुसार बडे साहब हा पाकिस्तानच्या राजकारणावर, लष्करावर आणि दहशतवादावर संपूर्ण नियंत्रण ठेवणारा व्यक्ती आहे. त्याच्या परवानगीशिवाय काहीही घडत नाही, असं कथेत वारंवार अधोरेखित केलं जातं. त्यामुळे हा रहस्यमय चेहरा अखेर कोणाचा, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता ‘धुरंधर 2’ मध्ये या सस्पेन्सचा उलगडा होतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ