Dhurandhar 2 : ‘धुरंधर २’ मधील ‘जमील जमाली’च्या एका ट्विस्टने पाकिस्तानात खळबळ!

spot_img

स्वतःला ‘रिअल हिरो’ म्हणणाऱ्या नबील गबोलची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींचा टप्पा पार करत यशाचे नवे शिखर गाठले आहे. मात्र, या यशासोबतच चित्रपटातील एका धक्कादायक ट्विस्टने प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवले आहे. ज्या ‘जमील जमाली’च्या भूमिकेने प्रेक्षकांना पोट धरून हसवले, तो प्रत्यक्षात भारताचा एक गुप्तहेर (स्पाय एजंट) असल्याचे क्लायमॅक्समध्ये उघड झाले आहे. या ट्विस्टमुळे केवळ पडद्यावरील पात्रेच नव्हे, तर खऱ्या आयुष्यात या भूमिकेचा दावा करणारे पाकिस्तानी नेते नबील गबोल यांचीही मोठी अडचण झाली आहे. पहिल्या भागापासून ही भूमिका आपल्यावरच आधारित असल्याचा ‘दबंग’ दावा करणाऱ्या गबोल यांना आता सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

नेटकऱ्यांनी नबील गबोल यांची फिरकी घेत, “आता तुम्ही ‘रॉ’ (RAW) चे एजंट झालात का?” असा उपरोधिक सवाल विचारला आहे. दरम्यान, या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना अभिनेते राकेश बेदी यांनी आधीच स्पष्ट केले होते की, हे पात्र कोणा एका व्यक्तीवर आधारित नसून अनेक पाकिस्तानी नेत्यांच्या निरीक्षणातून साकारले गेले आहे. दाऊदला विष देण्यापासून ते शत्रूच्या गोटात राहून भारतासाठी काम करण्यापर्यंतचा हा ‘स्पाय ट्विस्ट’ प्रेक्षकांसाठी मास्टरस्ट्रोक ठरला आहे. चित्रपटाची ही अफाट क्रेझ पाहता, रणवीर सिंहच्या दुहेरी भूमिकेसोबतच जमील जमालीची ही ‘छुपी ओळख’ सध्या इंटरनेटवर चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ