spot_img

Dharmendra Died : बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे निधन; राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली

spot_img

हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक आणि प्रेक्षकांच्या मनावर दशकानुदशके अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडपासून ते राजकीय क्षेत्रापर्यंत सर्वत्र शोककळा उसळली असून अनेक दिग्गजांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून श्रद्धांजली व्यक्त करत धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अप्रतिम वर्णन केले. ते म्हणाले की, “सुपरस्टार होण्याचा काळ संपतो, पण धर्मेंद्र हे त्या चौकटीत न अडकणारे कलाकार होते. त्यांनी कधीच अंगावर चढवलेला ग्लॅमर स्वीकारला नाही. पडद्यावर दिसणाऱ्या प्रतिमेपेक्षा प्रत्यक्ष जीवनातील त्यांचे रूप अधिक मनमिळाऊ, उत्कट आणि थेट मनाला भिडणारे होते.”

राज ठाकरे पुढे म्हणाले की, 1960 च्या दशकात पडद्यावर आलेला देखणा, दमदार शरीरयष्टी असलेला आणि तरीही मृदू स्वभावाचा तरुण पुढे संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीवर मोहिनी घालून गेला. त्यांचे मोहक हास्य, सहज दिसणारा मर्दानीपणा आणि कधीही न दिसलेली दांडगाई या सर्व गुणांनी त्यांना वेगळं स्थान दिलं.

करिअरच्या प्रारंभी बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळणे हीच त्यांच्या कलेची साक्ष आहे. त्यानंतर ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद, रमेश सिप्पी, राज खोसला, मनमोहन देसाई अशा अनेक प्रख्यात दिग्दर्शकांनी त्यांच्यावर भरवसा ठेवला. राज ठाकरे यांनी नमूद केलं की, “सिनेमा या गुंतागुंतीच्या जगात धर्मेंद्र हे एक स्वच्छ, साधे आणि मनाशी जवळचे माणूस होते. म्हणूनच ते जनसामान्यांचे कायमचे हिरो राहिले.”धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ