अहाना देओलची बालपणीची खास आठवण पुन्हा एकदा चर्चेत; वडिलांची पहिली Fiat कारच तिच्यासाठी सर्वात मौल्यवान ठरली
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्या धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनानंतर देओल कुटुंब शोकात बुडालं आहे. त्यांच्या जाण्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या अनेक आठवणी आणि जुने किस्से समोर येऊ लागले आहेत. त्यातच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची धाकटी मुलगी अहाना देओल हिच्या एका जुन्या मुलाखतीतील भावनिक गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत आहे.
अहानाने (Ahana) त्या मुलाखतीत सांगितलं होतं की तिला वडिलांच्या प्रॉपर्टीतून मोठ्या मालमत्तेची किंवा घरांची अजिबात इच्छा नाही. तिच्या मते, वडिलांनी वापरलेली पहिली Fiat गाडीच तिच्यासाठी सर्वात मौल्यवान आहे. “ती कार फक्त गाडी नाही, तर माझ्या लहानपणीच्या असंख्य आठवणींचं घर आहे,” असं ती म्हणाली होती.
अहानाने एक खास घटना सांगत आठवण काढली. “मी सुमारे सहा वर्षांची असताना एकदा बाबा लोनावळ्यातील फार्महाऊसला जात होते. आम्हाला ‘बाय’ म्हणताना ते अचानक थांबले आणि माझा हट्ट पाहून त्यांनी क्षणात माझी बॅग भरली आणि मला सोबत घेऊन गेले. त्या Fiat कारमध्ये मी त्यांच्या मांडीवर बसले होते. त्या दिवसाची आठवण माझ्या हृदयात कोरली गेलीय,” असे तिने सांगितले.
अहानाने हेही कबूल केले होते की लहानपणी मोठ्या पडद्यावर आई-वडिलांचा रोमँस पाहून ती गोंधळायची आणि रागवायचीदेखील. “आई मला सतत समजवायची की ते फक्त त्यांचं काम आहे, पण बालमनाला ते स्वीकारणं कठीण जायचं,” असं ती हसत म्हणाली होती. अहाना देओल सध्या सिनेसृष्टीपासून दूर असून शांत कौटुंबिक आयुष्य जगते. तिचे पती वैभव वोहरा असून ती अधूनमधूनच प्रकाशझोतात दिसते.




