धाराशिव (Dharashiv) जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. धाराशिवमध्ये एकीकडे तिरंगा निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाच्या उमेदवाराने विजय मिळवत विजयी खातं उघडलं आहे.
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली होती. आधी टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली आणि त्यानंतर मुख्य ईव्हीएम मशीनमधून मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या ३० मिनिटांमध्ये निकाल फिरला. धाराशिव तालुक्यातील ढोकी पंचायत समितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विजयी झाले आहे. अमर नाना समुद्रे हे विजयी झाली आहे. अमर नाना समुद्रे यांनी ४१८ मत मिळवून विरोधकांचा पराभव केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पंचायत समिती निवडणुकीत विजयी खातं उघडलं आहे. तर दुसरीकडे कळंब तालुक्यातील ईटकुर गटातून शिवसेनेचे उमेदवार आनंद पिंटू लंगडे विजयी झाले आहे. तर पंचायत समितीच्या दोन्ही जागा महायुतीच्या विजय झाला आहे.
धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा इथं पंचायत समितीची निवडणूक होत आहे. तर जिल्हा परिषदेसाठी एकूण ५५ जागा आहे. पंचायत समित्यांसााठी ११० जागांसाठी मतमोजणी होणार आहे. धाराशिवमध्ये सर्वाधिका ९६७ उमेदवार निवणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान, धाराशिव लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे तिकीट घेतल्यानंतर अर्चना पाटील यांचा दारुण पराभव खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. त्यानंतर आता अर्चना पाटील या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांनी यावेळी जिल्हा परिषदेत निवडणूक लढवली आहे. तेर गटात तिरंगी लढत पाहायला मिळत असून राष्ट्रवादीकडून शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय युती प्रदेशाध्यक्ष सलगर आणि ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे विश्वासू मुन्ना खटावकर यांच्या पत्नी कीर्तीमाला खटावकर यांच्यात ही लढत पाहायला मिळणार आहे. वरतून ही तिरंगी जरी लढत वाटत असली तरी इथं भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिष्ठा लागली आहे.




