spot_img

Dhananjay Sawant Car Accident : बारामतीजवळ भीषण अपघात; धनंजय सावंत थोडक्यात बचावले

spot_img

बारामती जवळ सोलापूर-पुणे महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सावंत हे आपल्या सहकाऱ्यांसह धाराशिवकडे जात असताना भिगवणजवळील डाळज २ परिसरात हा अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की, कारचा चालक बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातातून धनंजय सावंत थोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, गाडीतील चालक आणि सुरक्षारक्षकासह काही जणांना किरकोळ मार लागला आहे.

विशेष म्हणजे, सावंत यांनी नुकताच कुटुंबीय आणि समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुंबईत रवींद्र चव्हाण आणि रणजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला होता. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मोठी जीवितहानी टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ