spot_img

Devuthani Ekadashi 2025 : देवउठनी एकादशी बद्दल जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी !

spot_img

आजच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी

आज कार्तिकी एकादशी साजरी केली जातेय.कार्तिकी एकादशीलाच (Kartiki Ekadashi) देवउठनी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी अस देखील म्हणतात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षच्या एकादशी तिथीला देवउठनी एकादशी साजरी केली जाते. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी देखील म्हणतात. ही एकादशी फार महत्त्वाची असते कारण या काळात भगवान विष्णू (Lord Vishnu) चार महिन्यांनंतर जागृत होतात.मान्यतेनुसार, देवउठनी एकादशीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी काही विशेष उपाय करणं शुभकारक मानलं जातं. तर, देवउठनी एकादशीला राशीनुसार, कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात.

ही एकादशी सर्व महत्त्वाच्या एकादशींपैकी एक आहे. देवउठनी एकादशीपासून सर्व शुभ कार्याची सुरुवात करतात. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. ज्याप्रमाणे देवउठनी एकादशीचं महत्त्व आहे त्यानुसार या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. देवउठनी एकादशीच्या (Devuthani Ekadashi) दिवशी मद्यपान, मांसाहारी पदार्थ, कांदा, लसूण यांचं सेवन करु नये. या दिवशी फळ आणि दुधाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.त्याचप्रमाणे देवउठनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत. कारण हे अशुभ मानलं जातं. तुम्ही एकादशीच्या एक दिवसाआधी तुळशीची पानं तोडू शकता. देवउठनी एकादशीच्या दिवशी ॐ नमो भगवते वासुदेवाय या भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान कृष्ण यांना तुळशी पत्राबरोबर नैवेद्य दाखवावा. याशिवाय या शुभ दिनी भगवान विष्णूला कमळाचं फूल चढवावं.तसेच या दिवशी केस धुवू नये.एकादशीच्या दिवशी भक्तांनी निद्रा करु नये. विशेषत: जे उपवास करतायत त्यांनी झोपू नये,अपमानकारक भाषेचा वापर देखील आज करु नये.

पुराणानुसार, देवउठनी एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळल्याने अश्वमेधासारख्या सर्व तीर्थयात्रा आणि यज्ञांसारखेच फायदे मिळतात. जे लोक हे व्रत नियमितपणे रात्रभर जागृत राहून करतात त्यांना मोक्षाचे अंतिम ध्येय प्राप्त होते. त्यांचे जीवन सुख, समृद्धी, संतती आणि नातवंडांनी समृद्ध होते आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांना सर्वोच्च स्थान किंवा चार मुक्तींपैकी एक प्राप्त होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ