माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पेट्रोल आणि डिझेल साठ्याबाबत स्पष्ट माहिती दिली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानत सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी प्रति लिटर १० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा भार तेल कंपन्या आणि केंद्र सरकार उचलणार असून, ग्राहकांवर त्याचा अतिरिक्त परिणाम होणार नाही.
ते पुढे म्हणाले की, सध्या शेजारील काही देशांमध्ये परिस्थिती गंभीर असून, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश येथे काही ठिकाणी कार्यालये बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत भारताने इंधन आणि गॅस पुरवठा व्यवस्थित सांभाळला आहे.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केले की, अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. अशा प्रकारे रांगा लावल्यास पुरवठ्यावर ताण येऊ शकतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे नेहमीप्रमाणेच इंधन भरावे आणि संयम राखावा, अस




